मुलांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका गांधींच्या आरोपांवर सरकारने दिले उत्तर, म्हणाले…

प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींच्या आरोपांवर उत्तर दिले आहे

Instagram accounts congress leader priyanka Gandhi vadra children not compromised government
(PTI Photo)

काही दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी सरकार त्यांच्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य पाहता सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. दरम्यान, येत्या दोन-तीन महिन्यांत उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.

मंगळवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही भाजपा सरकारवर गंभीर आरोप केले होते हे लोक माझ्या मुलांचा इन्स्टाग्राम आयडीही हॅक करत आहेत असे प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. त्याचवेळी त्यांच्या या वक्तव्याची केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या आरोपांची दखल घेण्यात आली. याप्रकरणी, सरकारने स्वत: चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी, सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स संसाधन मंत्रालयाने एक निवेदन जारी केले की प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या मुलांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटशी छेडछाड केली गेली नाही. त्यांनी सरकारवर केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एका रॅलीदरम्यान प्रियांका गांधी वाड्रा यांनी सरकारवर आरोप केला होता की ते आता काही काम करत नाहीत. ते माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करत आहेत. केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत दुसऱ्याच दिवशी या प्रकरणाच्या चौकशीची चर्चा केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या दाव्याची दखल घेत चौकशी सुरू केली होती.

पेगॅसस मुद्द्यावरून संसदेत चर्चा न केल्याबद्दल केंद्रावर निशाणा

जनतेच्या प्रश्नांवर सरकार संसदेत चर्चा करत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. “पेगॅससचा विषय हा आंतरराष्ट्रीय विषय होता. भारताचा डेटा इतर कोणत्या तरी देशात ठेवला होता. यावरही सरकारने इथे चर्चा होऊ दिली नाही. लोकशाहीवर सातत्याने हल्ला होत आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Instagram accounts congress leader priyanka gandhi vadra children not compromised government abn

Next Story
“देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही, कारण…”; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी