Instagram : एका ३९ वर्षीय महिलेची तिच्या इन्स्टाग्रामवरील बॉयफ्रेंडने थोडी थोडी थोडकी नाही सहा लाखांना फसवणूक केली आहे. सदर मुलाची आणि महिलेची भेट इन्स्टाग्रामवर झाली. या प्रकरणात महिलेने मुलाला थोडे थोडके नाही तर सहा लाख रुपये दिले. त्यात तिची फसवणूक झाल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली.
कुठे घडली ही घटना?
बंगळुरु या ठिकाणी ही घटना घडली आहे. फसवणूक झालेली महिला पंथूर येथील रहिवासी आहे. फिलिप डॅनियल या यु.के.तील माणसाविरोधात तिने तक्रार नोंदवली आहे. या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर डॅनियल आणि ही महिला प्रेमातही पडले. The Ritz Carlton Yacht कलेक्शन या ठिकाणी मी संचालक आहे असं या माणसाने त्या महिलेला सांगितलं. ही लक्झरी क्रूझ कंपन आहे असंही त्याने तिला सांगितलं. यावर महिलेने विश्वास ठेवला.
फिलिप डॅनियल आणि महिलेचे प्रेमसंबंध
फिलिप डॅनियल आणि सदर महिला यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने या महिलेला १८ सप्टेंबरला हे सांगितलं की मला काही बॅग्ज आणि उंची घड्याळं तुला गिफ्ट द्यायची आहेत, जी मी खरेदी केली आहेत. २० सप्टेंबरला या महिलेला एक निनावी फोन आला. तिला सांगण्यात आलं आम्ही इमिग्रेशन विभागातून बोलत आहोत. तुमच्या साठी युकेवरुन गिफ्ट आलं आहे. मात्र त्याचा कर ३६ हजार रुपये तुम्हाला द्यावा लागेल. यानंतर महिलेने ३६ हजार रुपये भरले. त्यानंतर तिला १० लाख रुपये आणखी भरण्यास सांगितलं गेलं. वस्तू महाग आहेत त्यामुळे कर जास्त आहे असंही या फोन कॉलवर सांगण्यात आलं.
पोलिसांनी काय सांगितलं आहे?
या महिलेने पोलिसांना जी तक्रार दिली आहे त्यात तिने सांगितलं की तिला इमिग्रेशन विभागाकडून बोलत आहोत असे वेगवेगळे फोन कॉल आले आणि तिची सहा लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. त्यानंतर हे नंबर स्विच ऑफ झाले. या प्रकरणात महिलेने डॅनियलच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. १८ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर अशा दोन्ही दिवशी आपली फसवणूक झाल्याचं या महिलेने म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात कलम ६६ ड, कलम ६६ क, कलम ३१८ या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी लोकांना सावध राहण्यास आणि अशा प्रकारच्या घटनांना बळी पडू नका असं सांगत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.