Ramgopal Yadav : इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर रील्स तयार करणं हे काही आता नवं राहिलेलं नाही. अनेक प्रकारची रील्स तयार करण्यात येतात. अशात समाजवादी पक्षाचे खासदार प्रोफेसर रामगोपाल यादव ( Ramgopal Yadav ) यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात इन्स्टाग्राम रील्सचा मुद्दा उपस्थित केला गेला. यावेळी रामगोपाल यादव यांनी असं म्हटलं आहे की इन्स्टाग्रामवर रीलकरी असे कपडे घालतात की नजर शरमेने खाली जाते. त्यांचं हे भाषण चर्चेत आहे. काय म्हणाले रामगोपाल यादव? Ramgoapl Yadav "अध्यक्ष महोदय, आमचा काळ असा होता की आम्हाला इंग्रजी शिकायला मिळालं ते सहाव्या इयत्तेपासून. मुलाला लिहिता वाचता येऊ लागल्यानंतर त्या काळात इंग्रजी भाषा शिकवली जात असे. त्यावेळी शिकवलं जात असेल कॅरेक्टर महत्त्वाचं आहे ते हरवलं की सगळं हरवलं. आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशी स्थिती आहे. असं रामगोपाल यादव ( Ramgopal Yadav ) म्हणाले. या प्लॅटफॉर्मवर अश्लीता, नग्नता यांना प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी घडत आहेत. मी खास करुन इन्स्टाग्राम रील्सबाबत हेच म्हणेन अशा रिल्स आणि ते करणारे रीलकरी समाज बिघडवत आहेत असंही Ramgopal Yadav म्हणाले. जे काही वेगवेगळे अहवाल समोर आले आहे त्यानुसार देशातले तरुण रोज तीन तास रील्स पाहण्यात घालवतात. अश्लीलता, नग्नता पसरवणारे रील्स भारतातला तरुण रोज सरासरी तीन तास पाहतो असा याचा अर्थ आहे." असं रामगोपाल यादव ( Ramgopal Yadav ) यांनी म्हटलं आहे. हे पण वाचा- वादग्रस्त शोमध्ये लग्न अन् फक्त दोन महिन्यात घटस्फोट; प्रसिद्ध अभिनेत्री नंतर पायलटच्या प्रेमात पडली पण… तरुणाईचा कुटुंबाशी संवाद तुटत चालला आहे यानंतर रामगोपाल यादव म्हणाले, " तरुणाईचा कुटुंबाशी संवाद हरवत चालला आहे. बरोबर बसून जेवण करणं, बरोबर बसून गप्पा मारणं यामुळे प्रेम आणि आपुलकी वाढते. आजकाल लोक बरोबर बसतात पण फोन घेऊन. त्यांचं एकमेकांकडे लक्ष नसतं. आजकाल बातम्याही वाचायला मिळतात इन्स्टाग्रामवर ओळख झाली, मैत्री झाली मग लग्न झालं. त्यानंतर मुलाने मुलीची हत्या केली. अशा प्रकारच्या घटना या रिल्समुळे होत आहेत. समाजात मद्य सेवनाचं प्रमाणही या रिल्समुळे वाढलं आहे." असं म्हणत यादव यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. फौजिया खान काय म्हणाल्या? यानंतर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनीही रिल्स आणि ऑनलाइन गेम्सचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, "ऑनलाइन गेम्समुळे मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो आहे. पुण्यातल्या एका मुलाने ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केली. त्यामुळे सरकारने या ऑनलाइन गेम्स आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत एक नियमावली जाहीर केली पाहिजे." तर आपचे पंजाबचे खासदार विक्रमजीत साहनी यांनी सोशल मीडियाद्वारे तिरस्कार आणि द्वेष पसरवला जातो आहे असं म्हटलं. विक्रमजीत सिंह काय म्हणाले? विक्रमजीत सिंह म्हणाले, "सध्याच्या घडीला सोशल मीडियावर कुठलंही बंध नाही. सोशल मीडियावर काहीही लिहिलेलं, बोललेलं, पोस्ट केलेलं चालतं. पंतप्रधान मोदी असोत, काँग्रेसचे नेते असोत किंवा आणखी कुणीही दिग्गज माणूस कुणावरही काहीही शेरेबाजी केली जाते. त्यासाठी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते. सोशल मीडियाद्वारे तिरस्कार पसरवला जातो." असं म्हणत त्यांनी याकडे लक्ष वेधलं.