एपी, पोर्ट-औ-प्रिन्स

हैतीचे अध्यक्ष जोवेनल मोईसे यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत देशाला स्थैर्य आणण्याचा, तसेच निवडणुकांचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, प्रमुख पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी सैन्य तैनात करण्याची विनंती आपण अमेरिकेला केली आहे, असे देशाच्या अंतरिम सरकारने शुक्रवारी सांगितले.

‘आम्हाला मदतीची नक्कीच गरज असून आमच्या आंतरराष्ट्रीय मित्रदेशांना आम्ही मदतीसाठी आवाहन केले आहे’, असे अंतरिम पंतप्रधान क्लाऊडे जोसेफ यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, मात्र त्याचे तपशील त्यांनी दिले नाहीत.