आंतरराष्ट्रीय विमानसेवेसंबंधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा सुरु होण्यासाठी करावी लागणार प्रतिक्षा

संग्रहित

देशांतर्गत प्रवासी विमानसेवा टप्याटप्याने सुरु करण्यात येत असताना आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र अद्यापही सुरु झालेली नाही. जगावर असलेलं करोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाही. यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १५ जुलैपर्यंत प्रस्तावित असणारी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची उड्डाणं रद्द असणार आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केला आहे.

आदेशात देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा आदेश आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपररेशन तसंच नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून संमती मिळालेल्या विमानांना लागू असणार नाही.

आणखी वाचा- मोठी बातमी! १ जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचे नियम

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोदी सरकारने टाळेबंदी लागू केली. त्यामुळे देशातील सर्व व्यावसायिक विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. विमान सेवा क्षेत्राला करोनाचा मोठा फटका बसला आहे. देशांतर्गत प्रवासी विमानसेवा सोमवार, २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरु कऱण्यात आली आहे मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा कधी सुरू होईल, याबाबतची अनिश्चितता कायम आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: International commercial passenger services to remain suspended till 15th july sgy

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या