scorecardresearch

आंतरराष्ट्रीय विमान सेवेला आकाश मोकळे ; २७ मार्चपासून सेवा पूर्ववत

जुलै २०२० पासून ३७ देशांशी कराराद्वारे भारताने विशेष विमानसेवा सुरू ठेवली होती़ 

नवी दिल्ली : करोनाकाळातील दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला आकाश मोकळे झाले आह़े  २७ मार्चपासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केल़े करोना प्रादुर्भावामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा २३ मार्च २०२० रोजी स्थगित केली होती़  मात्र, जुलै २०२० पासून ३७ देशांशी कराराद्वारे भारताने विशेष विमानसेवा सुरू ठेवली होती़  आता करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, असे हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितल़े  या निर्णयामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला़ जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण वाढले आह़े  या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला़. या सेवेसाठी आरोग्य मंत्रालयाने  प्रसृत केलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे हवाई वाहतूक मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केल़े हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील स्थगिती २६ मार्चपर्यंत राहील़  त्यानंतर  २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: International flights to resume after 2 years from march

ताज्या बातम्या