International Yoga Day आज शुक्रवारी (२१ जून) जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. योग दिनानिमित्त क्लायमेट अॅक्शन ही थीम आहे. भारतातील अनेक राज्यांत पहाटेपासूनच योग शिबिरांना सुरुवात झाली असून आबालवृद्ध यात सहभागी झाले. योगविषयक जागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांचीमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि योग गुरू रामदेव बाबा यांनी नांदेडमध्ये योगासनं केली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी भारतीय जनतेला योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री, आधिकारी सेलिब्रेटी यांच्यासह जगभरातून योगसाधना करत पाचवा योद दिवसा उत्सहात साजरा केला. राजनाथ सिंह, अमित शाह, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, पियूष गोयल, रवी शंकर प्रसाद, जयंत सिन्हा आणि प्रकाश जावडेकर यांनी योगासनं करत पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. विविध आजारांमुळे गरिबांना त्रासाला सामोरं जावं लागते. देशामध्ये एकीकडे गरिबी कमी होत असताना त्यांच्यासाठी योगाचे माध्यम पोहोचायला पाहिजे. गरिबांपर्यंत योगा पोहोचल्याने ते आजारांपासून वाचू शकतील. यामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. भारतीय जवानांनीही योग दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. कोणी आयएनएस युद्ध नौकेवर तर कोणी हिमालयातील बर्फाच्या डोंगरामध्ये योग करुन योग दिन साजरा केला. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(BSF) च्या डॉग स्कॉड पथकातील कुत्र्यांनी प्रशिक्षकांसोबत योगा केल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले. भारतीय जवानांनी उणे २० डिग्री तापमानात तसेच नदीमध्ये आणि नक्शली भागात योगासने केली.