scorecardresearch

Premium

Protest Against Agnipath Scheme : बिहारमध्ये १२ जिल्ह्यांमधील इंटरनेटसेवा बंद, शांतता राखण्याचे आवाहन

केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलात जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. मात्र या योजनेला संपूर्ण भारतभरातून विरोध केला जातोय.

BIHAR PROTEST
बिहारमध्ये १२ जिल्ह्यांमध्ये इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलात जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. मात्र या योजनेला देशभरातून विरोध केला जातोय. बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर तरुण रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, सध्याची अशांततेची परिस्थिती लक्षात घेता बिहार सरकारने एकूण १२ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले असून येथे शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींनी घेतली आई हिराबा यांची भेट; पाय धुतानाचे, पाया पडतानाचे फोटो शेअर करत म्हणाले, “आज मी…”

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितलं कारण, म्हणाले…

बिहार सरकारने कैमेर, भोजपूर, औरंगाबाद, बक्सर, नावाडा, पश्चिम चंपारण, समस्तीपूर, लखीसराय, बेगुसराय, वैशाली आणि सारण या एकूण १२ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १९ जूनपर्यंत या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद असेल. तसेच कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तेनात करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा >>> “आम्हाला सैन्य भाड्याने नको”; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ‘अग्निपथ’ योजनेवर हल्लाबोल

“काही समाजकंटक इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियारवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करत आहेत. या मजकुराच्या माध्यमातून जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. जनतेला भडकावून जीवित तसेच वित्तहानी करण्याचा प्रयत्न करण्यात केला जातोय,” असे बिहार सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> Agnipath Scheme Protest in Bihar अग्निपथ योजनेच्या विरोधात विद्यार्थ्यांची बिहार बंदची हाक; विरोधी पक्षांचा पाठिंबा

तसेच एकूण बारा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाग स्थगित करण्यात आली असली तरी सरकारी कार्यालये, बँक कार्यालयांमधील इंटरनेट सेवा सुरु राहील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेदेखील बिहार सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मोदी सरकारच्या अग्निपथ या योजनेच्या विरोधात सर्वप्रथम बिहार राज्यातून विरोध केला गेला. नंतर हा विरोध संपर्ण भारतात पसरला असून अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. तरुणांकडून या योजनेला कडाडून विरोध केला जातोय.

हेही वाचा >>> आंदोलन आटोक्यात आणण्याचे प्रयत्न; ‘अग्निपथ’ भरतीचा तरुणांनी लाभ घ्यावा : केंद्र सरकार तसेच भाजपचे आवाहन

दरम्यान, बिहार जिल्ह्यातील बालिया या जिल्ह्यात पोलिसांनी आतार्यंत ३०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर १०९ पेक्षा जास्त निदर्शकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. बालिया जिल्ह्यात पुढील २ महिने कलम १४४ लगू करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-06-2022 at 14:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×