युक्रेनवरील आक्रमण सुरू ठेवण्याची किंमत रशियाला ‘येत्या अनेक पिढय़ांपर्यंत’ मोजावी लागेल, असा इशारा युक्रेनच्या अध्यक्षांनी शनिवारी दिला. आपल्या अडकून पडलेल्या सैनिकांच्या समर्थनासाठी रशियाने मोठा मेळावा आयोजित केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, रशिया युक्रेनमधील शहरांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही युक्रेनच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

 रशिया जाणूनबुजून ‘एक मानवी संकट’ निर्माण करत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रात्री एका दूरसंदेश भाषणात केला आणि आणखी रक्तपात टाळण्यासाठी आपल्याला भेटण्याचे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना केले.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

 ‘या मेळाव्याला २ लाख लोकांनी हजेरी लावली असून, ही संख्या युक्रेनमध्ये तैनात करण्यात आलेल्या रशियन फौजांइतकीच आहे. शुक्रवारी मॉस्कोत झालेल्या या कार्यक्रमामुळे, दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगातील सगळय़ात मोठय़ा संघर्षांशी किती लोक संबंधित आहेत ते दिसून आले,’ असेही झेलेन्स्की म्हणाले.

 ‘मॉस्कोतील त्या स्टेडियममध्ये १४ हजार मृतदेह आणि जखमी व अपंग झालेले हजारो लोक आहेत असे चित्र तुम्ही स्वत:च डोळय़ांसमोर आणा. रशियाने केलेल्या आक्रमणाची ही आतापर्यंतची किंमत आहे,’ असे राजधानी कीव्हमधील आपल्या अध्यक्षीय कार्यालयाबाहेर उभे राहून केलेल्या भाषणात झेलेन्स्की यांनी सांगितले.

 रशियाने २०१४ साली युक्रेनमधून क्रिमिया खालसा केल्याच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पुतिन यांनी त्यांच्या देशाच्या लष्करी दलांची प्रशंसा केली. ‘मेड इन द यूएसएसआर’ यासारखी देशभक्तीपर गाणी या वेळी गायली गेली. ‘युक्रेन आणि क्रिमिया, बेलारूस आणि मोल्दोवा, हे सर्व आमचा देशच आहेत,’ अशी या गाण्याची सुरुवात आहे. ‘बऱ्याच काळापासून आम्ही अशा प्रकारचे ऐक्य पाहिले नव्हते,’ असे पुतिन यांनी आनंदाने घोषणा देणाऱ्या लोकांना उद्देशून सांगितले.

हल्ला तीव्र

दरम्यान, रशियाने २४ फेब्रुवारीला केलेल्या आक्रमणानंतर तीन आठवडय़ांहून अधिक काळाने युक्रेनमध्ये अनेक आघाडय़ांवर युद्ध चिघळले. कीव्ह शहराच्या वायव्येकडील बुचा, होस्तोमेल, इर्फिन व मोश्चुन या उपनगरांवर शनिवारी तोफगोळय़ांचा जोरदार मारा करण्यात आल्याचे कीव्हच्या क्षेत्रीय प्रशासनाने सांगितले.

 मारिओपोल या वेढल्या गेलेल्या बंदराच्या शहरात, युरोपमधील सर्वात मोठय़ा पोलाद संयंत्रांपैकी एक असलेल्या अझोवस्ताल संयंत्रावर नियंत्रणासाठी युक्रेनी व रशियन फौजांध्ये तुंबळ युद्ध झाले, अशी माहिती युक्रेनच्या अंतर्गत मंत्र्यांचे सल्लागार वादिम देनिसेन्को यांनी शनिवारी दिली. ‘युरोपमधील सर्वात मोठय़ा धातुशास्त्र संयंत्रापैकी एक असलेले हे संयंत्र प्रत्यक्षात नष्ट करण्यात येत आहे,’ असे ते दूरचित्रवाणीवर म्हणाले.

 दरम्यान,  युक्रेनी क्षेपणास्त्रे व हवाई दारूगोळा साठवलेले युक्रेनच्या पश्चिमेकडील इव्हानो- फ्रँकिव्हस्क क्षेत्रातील भूमिगत गोदाम किंझाल क्षेपणास्त्रांनी नष्ट केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

हल्ल्यात आणखी सात नागरिक ठार

कीव्ह :  रशियाने युक्रेनवर शुक्रवारी केलेल्या तोफमाऱ्यात कीव्हनजीक सात नागरिक ठार झाले. युक्रेनवर स्वनातील क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली. हा हल्ला माकारिव्ह शहरावर करण्यात आला. तोफमाऱ्यात ठार झालेले सातही जण हे सर्वसामान्य नागरिक होते, असे शनिवारी स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले. रशियाच्या संरक्षण खात्याने म्हटले आहे की, हल्ल्यासाठी स्वनातील किन्झल क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. युक्रेनच्या लष्कराचे  ओडेसानजीकचे रेडिओ रेकोनॅन्सन्स केंद्र नष्ट करण्यात आल्याचा दावा रशियाने केला.