scorecardresearch

Premium

मणिपूरमधील २० प्रकरणांचा तपास ‘सीबीआय’कडे

कुकी व मैतेई पालकत्व असलेल्या सात वर्षांच्या मुलाला त्याची आई व मावशीसह जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेसह वीस प्रकरणे मणिपूर पोलिसांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली आहेत.

cbi
‘सीबीआय’

पीटीआय, इम्फाळ

कुकी व मैतेई पालकत्व असलेल्या सात वर्षांच्या मुलाला त्याची आई व मावशीसह जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेसह वीस प्रकरणे मणिपूर पोलिसांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली आहेत. राज्यात ३ मेपासून उफाळलेल्या वांशिक संघर्षांचा तपास सीबीआयने सुरू केला आहे.

What did Pune get in the state budget for the year 2024-25
अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय?… वाचा सविस्तर
Nagpur Bench High Court
केवळ घटनास्थळी उपस्थित होते म्हणून… ३६ वर्षांनंतर निर्णय देताना उच्च न्यायालय काय म्हणाले जाणून घ्या
Chandrapur, Murder Case, Friend Killed, Buried, dumping yard, five arrested,
चंद्रपूर : मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात
Jewelery looted fake police Sangli district
सांगली : तोतया पोलिसाकडून सव्वा लाखाच्या दागिन्यांची लूट

पश्चिम इम्फाळ जिल्ह्यातील इकोइसेंबा येथे ४ जून रोजी पोलीस संरक्षणात निघालेल्या एका रुग्णवाहिकेवर जमावाने हल्ला करून ती पेटवून दिली होती. यात तोंसिंग हांगसिंग हा मुलगा मरण पावला. या मुलाची आई मैतेई समुदायाची असून वडील कुकी आहेत.

गोळीबाराच्या घटनेत डोक्यात गोळी लागून जखमी झालेल्या तोंसिंगला त्याची आई मीना हांगसिंग व मावशी लिडिया लोरेबाम या एक परिचारिका व चालक यांच्यासह रुग्णालयात घेऊन जात असताना जमावाने रुग्णवाहिकेवर हल्ला केला. जमावाने चालक व परिचारिकेला निघून जाऊ दिले, तर हवेत गोळीबार करणाऱ्या पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली.

पोलिसांनी लाम्फेल पोलीस ठाण्यात दाखल केलेला आणि मुलाचे वडील जोशुआ हांगसिंग यांनी कांग्पोक्पी पोलीस ठाण्यात दाखल केलेला असे दोन एफआयआर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investigation of 20 cases in manipur to cbi amy

First published on: 21-08-2023 at 02:32 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×