ह्यूस्टन : रॅपर ट्रॅव्हिस स्कॉट याच्या संगीत महोत्सवावेळी लोक अचानक मंचाकडे धावल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत किमान आठ जणांचा मृत्यू ओढवला. अ‍ॅस्ट्रोवल्र्ड येथे शुक्रवारी झालेल्या या दुर्घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला असून त्यात अमली पदार्थविरोधी अधिकारीही सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात काही जणांना अमली पदार्थ टोचण्यात आल्याच्या वृत्तानंतर ती शक्यताही तपासून पाहिली जात आहे. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ह्यूस्टन शहर पोलिसांचे प्रमुख ट्रोय फिनर यांनी सांगितले की, आम्ही याप्रकरणी मनुष्यवधाच्या गुन्ह्याच्या तपास सुरू केला असून  अमली पदार्थविरोधी अधिकारीही यात सहभागी झाले आहेत.  

Ashok gehlot
राजस्थानात फोन टॅपिंगप्रकरणी मोठे गौप्यस्फोट, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोतांवर गंभीर आरोप!
we can not interference against evms based on suspicion clarification by supreme court
निव्वळ संशयावरून हस्तक्षेपाची गरज नाही! ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
bjp attacks congress over sam pitroda wealth distribution remark
भाजपच्या हाती पित्रोदांच्या‘वारसा करा’चे कोलीत; भाजपचा हल्लाबोल, काँग्रेसची अडचण
pm narendra modi slams congress for sam pitroda inheritance tax remark
सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा; पित्रोदांच्या ‘वारसा कर’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी सॅम्युअल पेना म्हणाले की, या कार्यक्रमाला गेलेल्या अनेकांची नार्कन या अमली पदार्थ अतिमात्रा  प्रतिबंधक औषधाने चाचणी करावी लागेल. यात एका सुरक्षा अधिकाऱ्याचाही समावेश असून त्याच्या मानेमध्ये एका प्रेक्षकाने काही पदार्थ टोचल्याचे दिसत आहे.

अ‍ॅस्ट्रोवल्र्ड येथे हा कार्यक्रम शुक्रवारी झाला होता, त्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. एनआरजी पार्क येथे किमान पन्नास हजार लोक जमले होते.  कार्यक्रमाच्या आरंभालाच  लोकांनी रेटारेटी केली. काहींनी मंचावर जाण्यास सुरुवात केली. एका संगीत चाहत्याने सांगितले, की लोक प्रचंड उत्साहाने मंचाकडे धावत होते.

मृतांमध्ये १४ ते २७ वयाच्या व्यक्तींचा समावेश असून शनिवारी तेरा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे महापौर सिल्व्हेस्टर टर्नर यांनी सांगितले.

हॅरिस परगण्याच्या न्यायाधीश लिना िहडालगो यांनी सांगितले, की ज्याचा अंदाज बांधता येणार नाही अशा पद्धतीने घटना घडत गेल्या. पण या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कमी जागेत जास्त लोक आल्याने हा प्रकार झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अनेक लोकांनी अडथळे ओलांडून गर्दी करण्याचा प्रयत्न केला होता.

गर्दीच्या मानसशास्त्राचे ब्रिटनच्या सफोक विद्यापीठातील प्राध्यापक जी कीथ स्टील यांनी सांगितले, की प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी जे सांगितलेले असते त्यात  काही प्रमाणात भावनांच्या अतिरेकाने फरक असू शकतो.

क्षमतेच्या एक चतुर्थाश प्रेक्षक असतानाही दुर्घटना 

ह्यू्स्टनचे अग्निशमन अधिकारी सॅम्युअल यांनी सांगितले, की गर्दी नियंत्रणात ठेवता आली नसली तरी एकूण क्षमता २ लाख असताना पन्नास हजार लोकांना परवानगी दिली होती. असे असतानाही ही घटना झाली. सिनसिनाटी येथील रिव्हफ्रंट कोलीसियम येथे १९७९ मध्ये अशाच एका संगीत मैफिलीत ११ जण मरण पावले होते. १९८९ मध्ये शेफील्ड येथे हिल्सबरो स्टेडियम येथे ९७ जण ठार झाले होते.