scorecardresearch

तेलंगणात शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना

तेलंगणा सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी रयतू बंधू गुंतवणूक मदत योजना सुरू केली, असे राज्य सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

farmer-3
(संग्रहीत छायाचित्र)

पीटीआय, हैदराबाद : तेलंगणा सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी रयतू बंधू गुंतवणूक मदत योजना सुरू केली, असे राज्य सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्याचे कृषिमंत्री निरंजन रेड्डी यांनी सांगितले की, पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५८६ कोटी ६५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना राबविणारे तेलंगण हे देशातील पहिले राज्य ठरले असून भाजप किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनीही कधी अशी योजना राबविलेली नाही, असे रेड्डी म्हणाले. शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकांच्या खरेदीसाठी राज्य सरकार प्रतिएकर प्रतिहंगाम पाच हजार रुपये देते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investment support scheme farmers telangana investment help plan ysh

ताज्या बातम्या