आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस नेते पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या विरोधातील सीबीआयच्या याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सीबीआयने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने एजेंसीला आरोपी आणि त्यांच्या वकिलांना त्यांच्या दिवाणखान्यातील दस्ताऐवजांवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. दिल्ली हायकोर्टाने १८ मे रोजी पी चिदंबरम यांच्या खटल्याच्या सुनावणीला १८ मे रोजी स्थगिती दिली होती. चिदंबरम, कार्ती आणि इतरांना नोटिसा पाठवून सीबीआयच्या याचिकेवर उत्तर मागितले होते.

दुसरीकडे, विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांनी सक्तवसुली संचालनालयाला नोटीस जारी केली असून ९ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. चिदंबरम यांच्या वतीने दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते,की सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणाचे आरोपपत्र व इतर कागदपत्रे द्यावीत. नोंदीतील कागदपत्रात क्रमांक चुकले आहेत ती चूकही दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली असून त्यातील गहाळ कागदपत्रे देण्याची मागणी केली आहे.

कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा संमिश्र डोस मिळणार?; ICMR च्या अभ्यासात नवी माहिती

चिदंबरम यांना सीबीआयने आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी २१ ऑगस्ट २०१९ रोजी अटक केली होती, त्याच वर्षी १६ ऑक्टोबरला त्यांना सक्तवसुली संचालनालयाने काळ्या पैशाच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सहा दिवसांनी २२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता.