iPhone 18 Launch Update: आज अखेर बहुप्रतिक्षित आयफोन १८ सिरीज लाँच झाला आहे. आजची रात्र ॲपलच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. नवीन आयफोनची प्रतीक्षा अखेर संपली असून, अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या ॲपलच्या आयफोन १८चे आज, अनावरण करण्यात आले आहे. याचसंर्भातल्या सर्व अपडेट्स पाहुयात…
Apple iPhone 18: अखेर ऍपलचा धमाका! आयफोन 18ची भारतात किंमत किती ?
iPhone Duo फोल्डेबल किंमत
२५६GB (बेस मॉडेल): $2,000 (सुमारे ₹१,६७,००० हून अधिक - आंतरराष्ट्रीय किंमत)
२TB (टॉप व्हेरिएंट): $3,000 पर्यंत (सुमारे ₹२,५०,००० हून अधिक)
फोल्डेबल iPhone Duo ची पहिली अधिकृत झलक
फोल्डेबल iPhone Duo ची पहिली अधिकृत झलक
ॲपलने आपल्या फोल्डेबल iPhone Duo ची पहिली अधिकृत झलक दाखवली आहे. या फोनमध्ये पातळ टायटॅनियम डिझाइनसोबत दोन डिस्प्लेसाठी खास तयार केलेले सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. दोन्ही स्क्रीनवर एकसारखे आस्पेक्ट रेशो असल्याने बाहेरील आणि आतील डिस्प्लेमध्ये कंटेंट सहजपणे बदलता येतो.
फोनमध्ये डिस्प्लेच्या खाली FaceTime कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच नवीन Variable-Torque Hinge मुळे फोन उघडल्यानंतर आतील स्क्रीन सपाट राहते आणि चुंबकांच्या मदतीने तो सहज बंद करता येतो. फोनची फ्रेम एरोस्पेस-ग्रेड टायटॅनियमची असून त्यावर पॉलिश्ड फिनिश देण्यात आली आहे.
या फोल्डेबल फोनसाठी iOS 27 मध्येही विशेष बदल करण्यात आले आहेत. स्क्रीनवरील कंट्रोल्स अंगठ्याच्या सहज आवाक्यात ठेवण्यात आले असून, होम स्क्रीन डॉक उभा करण्यात आला आहे. मोठ्या डिस्प्लेचा फायदा घेत एकाच वेळी दोन होम स्क्रीन पेजेस पाहता येतील. मेल आणि मेसेजेसमध्येही अधिक माहिती एकाच वेळी पाहता येणार आहे.

ॲपलने नुकतेच AirPods 5 ची घोषणा केली आहे. यामध्ये ओपन-इअर डिझाइन, सुधारित ॲकॉस्टिक आर्किटेक्चर, Adaptive EQ आणि Personalized Spatial Audio देण्यात आले आहे. त्यामुळे युजर्सना अधिक इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव मिळणार आहे.
धूळ असो वा पाऊस किंवा पाणी एअर पाॅड५ आहेत वाॅटर आणि डस्टप्रूफ. एअर पाॅडवर आता आवाज कमी वा मोठा करण्याचे स्लाइडर
अॅपल वॉचमध्ये आता लाइव्ह रिवाईंड- काही सेकंदांपूर्वीचा संवाद पुन्हा ऐकता येणार आणि सिरी तो संवाद लेखी स्वरुपातही देणार.. बाळ रडतंय, दरवाजावरची बेल वाजली... आवाज ओळखून तुम्हाला सांगणार अॅपल वॉच
AirPods 5 मधील Active Noise Cancellation (ANC) मागील पिढीच्या तुलनेत ५० टक्के अधिक आवाज कमी करते. याशिवाय Live Translation आणि Siri AI चा हँड्स-फ्री वापरही करता येणार आहे. पाऊस, घाम आणि धुळीपासून टिकावाही सुधारण्यात आला आहे.
ANC सुरू असताना चार तासांपर्यंत ऐकता येईल, तर चार्जिंग केससह हा कालावधी २० तासांपर्यंत वाढतो. स्टँडर्ड मॉडेलची किंमत $129, तर वायरलेस चार्जिंग केस आणि अतिरिक्त फीचर्स असलेल्या मॉडेलची किंमत $149 आहे. दोन्ही मॉडेल्सची विक्री १८ सप्टेंबरपासून सुरू होईल.
ॲपलच्या नव्या iPhone 18 Pro सीरिजच्या किंमतीही समोर आल्या आहेत. iPhone 18 Pro (256GB) मॉडेलची सुरुवातीची किंमत $1,199, म्हणजेच सध्याच्या विनिमय दरानुसार अंदाजे ₹1.14 लाख इतकी आहे. भारतात ही किंमत १,६४,९०० अशी असेल.
तर iPhone 18 Pro Max (256GB) ची सुरुवातीची किंमत $1,299, म्हणजेच अंदाजे ₹1.24 लाख इतकी होते. भारतात ही किंमत १,७९,९०० अशी असेल. याशिवाय यंदा स्टोरेजच्या बाबतीतही मोठा पर्याय देण्यात आला असून, 2TB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध होणार आहे. मोठ्या प्रमाणात फोटो, व्हिडिओ आणि इतर फाइल्स स्टोअर करणाऱ्या युजर्ससाठी हा पर्याय विशेष उपयोगी ठरू शकतो.
iPhone 18 Pro (256GB): $1,199 ≈ - १,६४,९००
iPhone 18 Pro Max (256GB): $1,299 - १,७९,९००
iPhone 18 Pro मध्ये कॅमेरा विभागात मोठे अपग्रेड पाहायला मिळणार आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून, त्याला Apple Intelligence आणि AI फीचर्सची जोड मिळणार आहे. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ शूट करण्याचा अनुभव आणखी चांगला होण्याची शक्यता आहे.
या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओलाही अधिक सिनेमॅटिक लूक देता येणार आहे. AI आणि नवीन एडिटिंग टूल्सच्या मदतीने व्हिडिओची रचना आणि लूक अधिक प्रोफेशनल पद्धतीने बदलता येईल.
याशिवाय, वापरकर्त्यांना Pro Control हा पर्यायही मिळणार आहे. त्यामुळे कॅमेरा सेटिंग्जवर अधिक नियंत्रण ठेवता येईल. एक्सपोजर, फोकस आणि इतर सेटिंग्ज स्वतःच्या गरजेनुसार बदलण्याची सुविधा मिळणार असल्याने फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणाऱ्यांसाठी हे फीचर विशेष महत्त्वाचे ठरू शकते.
एकूणच, दमदार कॅमेरा, AI फीचर्स आणि Pro Control यामुळे iPhone 18 Pro फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची आवड असलेल्या युजर्ससाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.
iPhone 18 Pro मध्ये बॅटरीबाबत मोठी सुधारणा करण्यात आली आहे. या फोनमध्ये ३६ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सतत व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्ससाठी हा फोन फायदेशीर ठरू शकतो.
तर iPhone 18 Pro Max मध्ये बॅटरी आणखी दमदार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर या मॉडेलमध्ये तब्बल ४५ तासांपर्यंत सलग व्हिडिओ पाहता येणार आहे.३६ तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देणारी बैटरी. प्रो मैक्स मध्ये सिंगल चार्जवर ४५ तास सलग व्हिडिओ पाहता येणार
iPhone 18 Pro मध्ये Apple Intelligence चा आणखी विस्तार करण्यात आला आहे. आता Apple Intelligence सफारीमधील वेब पेजेस समजून घेऊ शकते, शॉर्टकट्समध्ये वैयक्तिक ऑटोमेशन तयार करू शकते आणि व्यावसायिक कॉलदरम्यान संबंधित माहिती समोर आणू शकते.
यासोबतच ॲपलने काही नवीन Visual AI टूल्सही दिली आहेत. यात अपग्रेडेड Image Playground, Photos मधील अधिक सक्षम Clean Up टूल, Extendच्या मदतीने इमेजचा विस्तार आणि Spatial Reframing यांचा समावेश आहे. Spatial Reframingमुळे फोटो काढल्यानंतर त्याची रचना आणि दृष्टीकोन बदलता येणार आहे.
#iphone18pro नव्या आयफोनबरोबर ए २० प्रोसेसर. आधीच्या प्रोसेसरपेक्षा ताकदवान.प्रथमच एआय एक्सेलेटरचा अंतर्भाव.

नव्या आयफोनमध्ये siri ची कार्यक्षमता वाढणार. कॅमेऱ्यापासून शॉपिंगपर्यंत टास्क करण्यासाठी उपयुक्त. मानवी डोळ्यालाही जे दिसत नाही ते अॅपल आयच्या नजरेला दिसणार
Phone 18 Pro तीन फिनिशमध्ये उपलब्ध
iPhone 18 Pro च्या डिझाइनमध्ये यंदा काही बदल करण्यात आले आहेत. फोनच्या ॲल्युमिनियम फ्रेम आणि मागील काचेच्या भागाचा रंग एकसारखा ठेवण्यात आला आहे. हा फोन तीन फिनिशमध्ये उपलब्ध असेल डीप ब्लॅक (Deep Black), ग्लेशियर (Glacier) आणि नवीन बरगंडी (Burgundy).
फोल्डेबल आयफोनशिवाय या ३ गोष्टींकडेही लक्ष
सर्वांचे लक्ष फोल्डेबल आयफोनकडे असले तरी, ॲपल आज आणखी काही महत्त्वाच्या फीचर्सची घोषणा करू शकते. यामध्ये प्रामुख्याने या तीन गोष्टींकडे लक्ष असेल.
व्हेरिएबल-ॲपर्चर कॅमेरा: आयफोनच्या कॅमेऱ्यात व्हेरिएबल-ॲपर्चर फीचर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकाशानुसार कॅमेऱ्याची सेटिंग बदलता येईल आणि फोटोचा अनुभव आणखी चांगला होऊ शकतो.
रिकॅप्स फीचर: ॲपल वॉचमध्ये प्रायव्हसीवर भर देणारे नवीन AI फीचर येण्याची शक्यता आहे. हे फीचर दिवसभरात काय घडले याचा, अगदी संभाषणांसह, सारांश देऊ शकते.
एअरपॉड्स ५: नवीन एअरपॉड्समध्ये ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन मॉडेल्स येऊ शकतात आणि वायरलेस चार्जिंग केसच्या उपलब्धतेनुसार त्यांच्यात फरक असू शकतो.
दरम्यान, नवीन आयफोनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
ॲपलच्या स्लिम आयफोनवर एक नजर
ॲपलच्या 'आयफोन १८ प्रो' (iPhone 18 Pro) मालिकेच्या लाँचपूर्वी 'आयफोन एअर' (iPhone Air) पुन्हा चर्चेत आला आहे. या फोनच्या माध्यमातून ॲपलने स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये मोठा बदल केला होता.
केवळ ५.६ मिमी जाडी असलेला 'आयफोन एअर' अतिशय पातळ आणि हलका आहे. यात 'A19 Pro' चिप, ६.५-इंचाचा डिस्प्ले, ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि १८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे पातळ डिझाइनसोबत चांगली कामगिरी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मात्र, फोनमध्ये केवळ एकच रिअर कॅमेरा असल्याने अल्ट्रा-वाइड आणि प्रगत झूमसारखे पर्याय मिळत नाहीत. भारतात १,१९,९०० रुपये किंमत असलेला हा फोन 'प्रो' मॉडेल्सच्या तुलनेत स्लिम आणि मिनिमलिस्ट पर्याय म्हणून सादर करण्यात आला होता.
ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन आज लॉन्च होणार का?
या इव्हेंटमधील सर्वात मोठे आकर्षण ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन ठरू शकतो. सध्या विविध रिपोर्ट्समध्ये या डिव्हाइसला ‘आयफोन अल्ट्रा’ असे म्हटले जात आहे; मात्र हे त्याचे अधिकृत नाव असल्याची पुष्टी झालेली नाही. लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोन पुस्तकासारख्या फोल्डेबल डिझाइनमध्ये येऊ शकतो. यामध्ये ७.८ इंचांचा इनर डिस्प्ले आणि ५.३ इंचांचा बाहेरील स्क्रीन असण्याची शक्यता आहे. या फोल्डेबल आयफोनमध्ये A20 प्रो चिप आणि १२ जीबी मेमरी दिली जाऊ शकते. कॅमेरा सिस्टिमबाबतही अनेक दावे समोर आले आहेत. या फोनमध्ये दोन ४८ मेगापिक्सेलचे रिअर कॅमेरे दिले जाऊ शकतात. मात्र, यामध्ये टेलिफोटो कॅमेरा नसल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन बाजारात दाखल झाल्यास, कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपमध्ये हा एक मोठा बदल मानला जाईल. त्यामुळे हा फोन प्रत्यक्षात आजच्या कार्यक्रमात सादर केला जाणार का, याकडे जगभरातील ॲपल चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये काय खास असेल?
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्स असण्याची शक्यता आहे. विविध अहवालांनुसार, दोन्ही मॉडेल्समध्ये TSMC च्या २nm तंत्रज्ञानावर आधारित A20 प्रो चिप दिली जाऊ शकते. या नव्या चिपमुळे फोनची कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच, सुधारित बॅटरी लाइफ आणि नवीन कॅमेरा सिस्टिम मिळण्याची शक्यता आहे. कॅमेऱ्याबाबतही अनेक चर्चा सुरू आहेत. आयफोन १८ प्रो सीरिजमध्ये मेकॅनिकल व्हेरिएबल ॲपर्चर दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या तंत्रज्ञानामुळे कॅमेऱ्यात येणाऱ्या प्रकाशावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल आणि वेगवेगळ्या प्रकाशमान परिस्थितींमध्ये फोटोग्राफीचा अनुभव सुधारण्यास मदत होऊ शकते.
भारतात ॲपल इव्हेंट कुठे पाहायचा?
आयफोन १८ लाँच इव्हेंट पाहण्यासाठी वापरकर्त्यांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील. ॲपल आपल्या अधिकृत वेबसाइट Apple.com, ॲपल टीव्ही ॲप तसेच ॲपलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (लाइव्हस्ट्रीम) करणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही किंवा इतर कोणत्याही समर्थित डिव्हाइसवर ॲपलचा हा खास लाँच इव्हेंट लाइव्ह पाहू शकता. आयफोन १८ सीरिजसह फोल्डेबल आयफोन किंवा इतर उत्पादनांची घोषणा होते का, याची उत्सुकता ॲपलच्या चाहत्यांना लागली आहे.

iPhone 18 Pro किंमत आणि फीचर्स
