scorecardresearch

Premium

आयपीएल इंडियन मुजाहिद्दीनच्या रडारवर

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने २०११ साली आयपीएल स्पर्धेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाच्या एका आधिका-याकडून सांगण्यात आले आहे.

आयपीएल इंडियन मुजाहिद्दीनच्या रडारवर

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने २०११ साली आयपीएल स्पर्धेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाच्या एका आधिका-याकडून सांगण्यात आले आहे. या तयारीचाच भाग म्हणून इंडियन मुजाहिद्दीनच्या एका हस्तकाने २०११ साली वानखेडे स्टेडियमवरील टी-२० मॅचअगोदर मैदानाची पाहणी केली होती. मात्र, वानखेडेवरील कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे इंडियन मुजाहिद्दीनचा हल्ल्याचा बेत बारगळला. मुंबईत जुलै २०११ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या असदउल्ला अख्तरअली तरबेज याच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. असदउल्लाचा साथीदार असणा-या वकास इब्राहिमने यासीन भटकळच्या सांगण्यावरून हल्ल्यासाठीच्या तयारीसाठी मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स यांच्यातील सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमच्या आत जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी वानखेडेवर कडक सुरक्षाव्यवस्था असल्याचे पाहणीत समोर आल्यानंतर हल्ल्याचा बेत रद्द करण्यात आला होता.  

tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2014 at 08:44 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×