IPS Shivdeep Lande Resign : बिहार केडरचे मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. शिवदीप लांडे यांनी जवळपास १८ वर्ष पोलीस खात्यात सेवा केली आहे. शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून ओळखलं जातं. दरम्यान, शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांनी अचानक राजीनामा का दिला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट काय?

“जय हिंद! माझा प्रिय बिहार, गेली १८ वर्षे शासकीय पदावर सेवा दिल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. माझ्या सरकारी नोकरीच्या कार्यकाळात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे. परंतु, मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार माझे कार्यस्थान असेल”, असं शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Heena Gavit Resigns from BJP
Heena Gavit : भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Manoj Jarange Patil in Assembly Election
Manoj Jarange Patil in Assembly Election : मनोज जरांगे यांच्या निर्णयाने उमेदवार नाराज
ajit ranade resigned
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा
nagpur district thackeray shiv sena chief devendra godbole resigned from his post
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
india china Disengagements
पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण
bank employee strike over
बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; लाडकी बहिण योजनेसाठी सुरक्षा वाढवण्याचे सरकारचे आश्वासन

हेही वाचा : कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?

महाराष्ट्र पोलीस सेवेतही काही वर्ष काम केलं

शिवदीप लांडे हे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी असले तरी त्यांनी महाराष्ट्र पोलीस सेवेतही काही वर्ष काम केलेलं आहे. मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकात असताना त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केल्या होत्या. शिवदीप लांडे यांना गुन्हेगारांवर बेधडक कारवाई करण्यासाठी ओळखलं जायचं. अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असताना त्यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी यशस्वी छापे टाकण्यात आले होते.

दरम्यान, शिवदीप लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळ महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी शिवदीप लांडे यांची बिहारमधील पूर्णियामध्ये आयजी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या पदाची जबाबदारीही स्वीकारली होती. मात्र, आयजी पदाचा पदभार घेऊन काही दिवस होताच शिवदीप लांडे यांनी आज (१९ सप्टेंबर) आपल्या पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवदीप लांडे यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचं कारण काय? याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.