मागील काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरु होते. हिजाब परिधान न केल्याने इराणमधील ‘संस्कृतीरक्षण पोलिसां’च्या मारहाणीत एक २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. यानंतर घटनेनंतर इराणमधील महिला ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’च्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. अखेर दोन महिने सुरु असलेल्या आंदोलनानंतर इराणचे सरकार झुकले आहे. इराणमधील ‘संस्कृतीरक्षक पोलीस’ हे पथक बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

याबाबत इराणचे अॅटर्नी जरनरल मोहम्मद जाफ मोंटाझेरी यांनी सांगितलं की, “संस्कृतीरक्षण पोलीस हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मात्र, हा निर्णय कायमस्वरुपी ही तात्पुरत्या स्वरूपासाठी घेण्यात आला आहे, याबद्दल माहिती दिली नाही.

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

हेही वाचा : Anti Hijab Protest: गायिकेनं चक्क स्टेजवर कापले केस; कारण जाणून आश्चर्य वाटेल, पाहा व्हिडीओ

हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’नी अटक केली होती. अटक केल्यावर महिसाची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. महसाच्या मृत्यूनंतर संस्कृतीरक्षक पोलिसांची तिचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला पेटून उठल्या होत्या.

हेही वाचा : विश्लेषण: महसा अमिनींच्या मृत्यूनंतर चर्चेत असलेल्या संस्कृतीरक्षक पोलिसांचे काम काय? इराणमध्ये हिजाबचे नियम काय आहेत?

तर, महासाच्या कुटुंबीयांनी तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण केल्याचा आरोप केला होता. पण, इराणच्या सरकारने महसाशी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन झाले नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर इराणमधील महिलांनी संस्कृतीरक्षक पोलिसांना विरोध करत हिजाब जाळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. जगभरातील कलाकार आणि खेळाडूंनीही हिजाबविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

काय आहे प्रकरण?

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांना हिजाब परिधान करणे अनिवार्य आहे. महिलांनी योग्य पद्धतीने हिजाब परिधान केला का नाही, यासाठी ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’ची नेमणूक करण्यात आली होती. हिजाबसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्यास ‘संस्कृतीरक्षक पोलीस’ महिलांना अटक करतात. याच कारणासाठी महसा अमिना या तरुणीला अटक करण्यात आली होती. मात्र, महसाच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधी आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला होता.