Iran targets Israel PM Benjamin Netanyahu’s office and military headquarters in a retaliatory strike : इस्रायलची राजधानी तेल अवीवमधील पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचे कार्यालयावर हल्ला केला असल्याचा दावा इराणने केला आहे. तसंच, हैफा व पूर्व जेरुसलेममधील सुरक्षा स्थळांसह इस्रायली सरकारी व लष्करी कार्यालयांवर हल्ला केला असल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) केला असल्याचं वृत्त वृत्तसंस्था IRNA च्या हवाल्यानुसार इंडिया टुडेने दिलं आहे.
“झिओनिस्ट राजवटीचे (इस्रायल) गुन्हेगार पंतप्रधानांचे कार्यालय आणि त्या राजवटीच्या हवाई दल प्रमुखांचे मुख्यालय आम्ही लक्ष केले आहे”, असे IRGC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या हवाई दलाच्या कमांडरच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इस्रायलने हल्ल्याचा दावा फेटाळला
इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सने सांगितले की, प्रत्युत्तराच्या दहाव्या टप्प्यात लक्ष्यित ठिकाणांवर गंभीरपणे हल्ले आले”. इराणी राज्य माध्यमांनी बिन्यामिन नेतान्याहू यांचे भवितव्य अनिश्चित असल्याचा दावा केला. मात्र, इस्रालयने पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा दावा फेटाळला आहे. शनिवारी अमेरिका-इस्रायली संयुक्त हल्ल्यात सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर तेहरानने दहा वेळा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचाही दावा इराणने केला आहे.
