Iran US Conflict Investigative Update on Satellite Photos showing actual damage at military bases : मध्यपूर्वेतील अमेरिकीच्या लष्करी तळांवर इराणने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मान्य केल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान झाले आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी जारी केलेल्या सॅटेलाईट फोटोंमधून ही बाब समोर आली आहे.
वॉशिंग्टन पोस्टने राबवलेल्या शोध मोहिमेत, इराणच्या यासंबंधीच्या दाव्यांना दुजोरा मिळाला आहे. या चौकशीत असे समोर आले आहे की, २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून इराणच्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवरील किमान २२८ इमारती किंवा उपकरणांचे नुकसान झाले आहे किंवा ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
इराणच्या हल्ल्यादरम्यान लक्ष्य ठरलेल्या गोष्टींमध्ये, मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या तळांवरील हँगर्स, बरकी, इंधनाचे डेपो, विमाने आणि महत्त्वपूर्ण रडार, कम्युनिकेशन आणि एअर डिफेन्स सिस्टम्स यांचा समावेश होता.
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यपूर्वेतील तळावर झालेल्या नुकसानाची व्यप्ती ही अमेरिकन सरकारने यापूर्वी मान्य केलेल्यापेक्षा खूप जास्त आहे. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या प्रदेशातील अमेरिकेचे काही लष्करी तळ हे सामान्य कर्मचाऱ्यांना ठेवण्यासाठी अत्यंत धोकादायक झाले होते आणि युद्धाच्या सुरुवातीलाच कमांडर्सनी या तळांवरील बहुतेक कर्मचाऱ्यांना हा तळांवरून इराणच्या हल्ल्याच्या टप्प्याबाहेर असलेल्या सुरक्षित स्थळांवर हलवले
युद्ध सुरू झाल्यापासून मध्यपूर्वेत किमान सात अमेरिकन सर्व्हिस मेंबर्सचा मृत्यू झाला. यापैकी सहा जणांचा कुवैतमध्ये तर एकाचा सौदी अरेबिया येथे मृत्यू झाला. याबरोबरच इतर ४०० जवान देखील जखमी झाले.
मार्च महिन्याच्या मध्यापासून मध्यपूर्वेतील सॅटेलाईट फोटो (Satellite Imagery) मिळवणे कठीण झाले आहे. कारण वँटोर आणि प्लॅनेट लॅब्स या दोन प्रमुख सॅटेलाईट फर्म युद्ध सुरू आहे तोपर्यंत या प्रदेशाचे फोटो मर्यादित करणे किंवा ते देणे लांबणीवर टाकणे किंवा प्रसिद्ध न करण्याबाबतच्या अमेरिकन सरकारच्या सूचनांचे पालन करत आहेत.
अमेरिकन सरकार या सॅटेलाईट इमेजरीचा सर्वात मोठे खरेदीदार आहेत, ज्यामुळे अमेरिका वँटोर आणि प्लॅनेट या कंपनीचा सर्वात मोठा ग्राहक आहे.
युद्ध सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आतच या सूचना देण्यात आल्याने इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यांच्या नुकसानीचा अंदाज लावणे प्रसारमाध्यमांसाठी कठीण झाले आहे.
असे असले तरी, इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांकडू युद्ध सुरू झाल्यापासून या प्रदेशाची उच्च दर्जाचे सॅटेलाईट फोटो सोशल मीडियावर नियमितपणे प्रसिद्ध केली जात आहेत. मात्र, ही छायाचित्रे बनावट असू शकतात, या भीतीने जागतिक स्तरावर त्यांना फारशी प्रसिद्धी देण्यात आली नाही.
पडताळणीत काय समोर आले?
वॉशिंग्टन पोस्टने राबवलेल्या शोधमोहिमेत, अशा शेकडो फोटोंचा आढावा घेतला गेला. त्यांनी यापैकी १०९ फोटोंची सत्यता पडताळून पाहिली. यासाठी त्यांनी युरोपियन युनियनच्या सॅटलाईट सिस्टमधील लोवर रिझॉल्युशन फोटोंशी, तसेच उपलब्ध असल्यास प्लॅनेट कंपनीकडील हाय रिझॉल्युशन फोटोशीं या फोटोंची तुलना केली.
या शोधामध्ये इराणने जारी केलेले फोटो बनावट असल्याचा एकही पुरावा आढळून आला नाही. एकंदरीत, या रिपोर्टमध्ये आढळून आले की, या प्रदेशातील किमान १५ लष्करी तळांवरील २१७ इमारती आणि ११ उपकरणांचे नुकसान झाले किंवा ते उद्ध्वस्त करण्यात आली.
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये कतारमधील अल-उदैद एअर बेस येथील सॅटलाईट कम्युनिकेशन केंद्राचे नुकसान झाले आहे. याबरोबरच, बहरीन आणि कुवेत येथील लष्करी तळांवरील पॅट्रियट मिसाईल डिफेन्स सिस्टमवर हल्ले झाले आहेत.
