मध्य पूर्वेतील युद्ध समाप्तीसाठी इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अराघची यांनी सात दिवसांची युद्ध समाप्ती प्रस्ताव सादर केला आहे. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या प्रस्तावात होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि अण्वस्त्र कार्यक्रमावर सखोल चर्चा करणे याचा समावेश असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
अराघची काय म्हणाले?
जूनमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य करारासारखाच हा प्रस्ताव असल्याचे अराघची यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही अटींद्वारे मध्यस्थींच्या माध्यमातून आम्ही अमेरिकेच्या समोर प्रस्ताव मांडला आहे. “सातव्या दिवशी होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली जाईल आणि चर्चा पुन्हा सुरु होईल. अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी करार झाला तर उत्तम होईल,” असे अराघची न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना म्हणाले.
शांततापूर्ण चर्चेस इराण तयार
यापूर्वी अराघची आणि जपानचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफूल यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत अराघची यांनी वाटाघाटी सुरु करण्यासाठी आवश्यक अटी आणि इतर तपशील अमेरिकेच्या नेत्यांना कळवला असल्याचे अराघची म्हणाले. भागात शांतता निर्माण होण्यासाठी अमेरिकेचा इराण होणारा हस्तक्षेप आणि आक्रमक कारवाया थांबणे आवश्यक असल्याचेही अराघची यांनी नमूद केले. अण्वस्त्र कार्यक्रम आणि इतर मुद्यांवर इराण शांततापूर्ण चर्चा करण्यास तयार असल्याचेही अराघची म्हणाले.
अमेरिकेवर टीका
शांततापूर्ण चर्चा आणि वाटाघाटी करण्यावर इराणचा विश्वास असल्याचे अराघची म्हणाले. होर्मुझ सामुद्रधुनीतील अशांततेबद्दल इराणला दोष देण्याबाबत प्रश्न उपस्थित करत अराघची यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करावरही बोट ठेवले. अराघची यांनी यावेळी जर्मनीसह युरोपीय देशांवर टीका केली. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या वर्षी जूनमध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या अपयशाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला जबाबदार धरले.
पेझेश्कियान काय म्हणाले?
आम्ही करारापर्यंत पोहोचलो होतो, त्या करारावर स्वाक्षरी झाली होती, आणि त्याच्या आधारावर, आम्ही पुढे जाण्यास इच्छुक आहोत आणि आमची तशी इच्छाही आहे. आराखड्यावरही सहमती झाली होती. आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली नव्हती, ती खुली होती पण, त्यांनी आमच्यावर हल्ला केला. सर्वोच्च नेते, अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. समस्या अशीय की अमेरिका चर्चा करण्यापेक्षा आमच्यावर हल्ले करण्यास प्राधान्य देत आहे, असे मसूद पेझेश्कियान म्हणाले.
