US Iran Israel War Updates : गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला विराम मिळाला होता. ८ एप्रिल रोजी या तिन्ही देशांमध्ये युद्धविरामाचा करार झाल्याने संघर्ष थांबला होता. कायमच्या युद्धबंदीकरता तिन्ही देशांत वाटाघाटी अन् चर्चा सुरू होत्या. मात्र, इराणने आज सकाळीच इस्रयालवर भीषण हल्ला करत क्षेपणास्त्रे डागले. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही प्रतिहल्ला करण्यात आला. दरम्यान, या घडामोडींमुळे जगभर पुन्हा एकदा युद्धाचं सावट निर्माण झालं आहे. तर, हे युद्ध थांबावं म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करत आहेत.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने कब्जा मिळवला असला तरीही अमेरिकेकडूनही यावर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. परिणामी जागतिक जलवाहतुकीत कोंडी निर्माण झाल्याने इंधन दर गगनाला भिडले आहेत. त्यातच, इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा युद्ध सुरू झाल्यास या युद्धाचे चटके थेट सामान्य माणसाच्या खिशाला बसणार आहेत. यासह या संघर्षाबाबतचे नव-नवे अपडेट्स जाणून घेऊयात.
Middle East War Live Updates : इराण-इस्रायल संघर्षातील लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या
पुण्यातील ऐतिहासिक भिडे पूल उद्या रात्रीपासून बंद
NEET UG Re-Exam: नीट पुनर्परीक्षेचा पेपर फुटू नये म्हणून ‘एनटीए’ची खबरदारी, प्रश्नपत्रिका तयार करणारे तज्ज्ञ ‘नजरकैदेत’
Maharashtra Monsoon update: मान्सूनचे पुढचे पाऊल, राज्यातील 'या' प्रदेशात मान्सून दाखल
अपुऱ्या प्रशिक्षणाने घात, कंत्राटी चालकांना ४ आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक
विद्युत बसचे अपघात का वाढत आहेत?
भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेना कॉल करा
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ व्यावसायिक जहाजावर हल्ला? २४ भारतीय खलाशी अडकले, केली तातडीच्या मदतीची मागणी
कामोठेतील अंधाराची 'प्रकाशगडा'कडून दखल नवीन ५ एमव्हीए क्षमतेचे रोहीत्र तातडीने बसवणार
वरसोली बंदऱ्याला टेट्रापॉडचे अभेद्य कडे; ८० कोटींच्या ग्रोयेन्स बंधाऱ्यामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा
रिक्षाचालकांना 'कोमसाप' देणार मराठीचे धडे
युद्ध पुन्हा भडकताच भारताने मांडली महत्त्वाची भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाकडून युद्धग्रस्त देशांना आवाहन
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी धोक्यात आल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टद्वारे इराण आणि इस्रायलला "गोळीबार" थांबवण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांनी लिहिले, "इस्रायल आणि इराणने तात्काळ गोळीबार थांबवला पाहिजे."
येमेनच्या इराण-समर्थित हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्रातील इस्रायली सागरी वाहतुकीवर बंदी जाहीर केली आहे. यामुळे या जलमार्गात इस्रायलशी संबंधित जहाजे संभाव्य लक्ष्य बनू शकतात.
Live Updates : इस्रायलचा ड्रोन हल्ला इराणने रोखला
इराणच्या प्रसारमाध्यमांनी सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने तेहरानवर ड्रोन हल्ला केला असून इराणने हा हल्ला अडवला. परिणामी याचा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाचा आवाज इस्फहान शहरातही ऐकू आला.
"तत्काळ इराण सोडा", इराणमधील भारतीय नागरिकांना सरकारच्या सूचना
इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय दूतावासाने एक नवीन मार्गदर्शक सूचना (ॲडव्हायझरी) जारी केली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्यास सांगण्यात आले आहे, तसेच सध्या इराणमध्ये असलेल्या नागरिकांना उपलब्ध वाहतूक साधनांचा वापर करून लवकरात लवकर देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की, "या भागातील ताज्या घडामोडी लक्षात घेता, दूतावास सर्व भारतीय नागरिकांना इराणचा कोणताही प्रवास टाळण्याच्या आधीच्या सल्ल्याचा पुनरुच्चार करत आहे. सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनाही उपलब्ध वाहतूक साधनांद्वारे देशाबाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे."
ही मार्गदर्शक सूचना विद्यार्थी, व्यावसायिक, यात्रेकरू आणि पर्यटकांसह सध्या इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना लागू आहे. चालू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान भारताने जारी केलेली ही ८ वी मार्गदर्शक सूचना आहे.
इस्रायलने इराणवर केलेले ताजे हल्ले आणि आदल्या दिवशी लेबनॉनवर झालेले हल्ले यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती ४ डॉलरपेक्षा जास्त वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स ४.४२ डॉलर म्हणजेच ४.४७% वाढून ९७.१५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले, तर अमेरिकन क्रूड फ्युचर्स ४.०७ डॉलर म्हणजेच ४.५०% वाढून ९४.६१ डॉलर प्रति बॅरलवर ट्रेंड करत होते.
इस्रायल-इराण हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
सोमवारी पहाटे इस्रायल आणि इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण मध्य-पूर्व प्रदेश पुन्हा एकदा पूर्ण-प्रमाणातील प्रादेशिक युद्धात ओढला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचवेळी, येमेनच्या हौथी बंडखोरांनीही इस्रायलवर गोळीबार केला आणि तांबड्या समुद्रातील इस्रायलशी संलग्न जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला. यामुळे तणाव आणखी वाढला. तेहरानकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सोमवारी पहाटे मध्य आणि पश्चिम इराणवर हल्ले केले आणि इराणनेही अनेक हल्ले करून त्याला प्रत्युत्तर दिले. ८ एप्रिल रोजी झालेल्या शस्त्रसंधीनंतरचा हा सर्वात गंभीर चकमकीचा प्रकार आहे.
इराणकडून इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्रांचा मारा, इस्रायली लष्कराकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, तेहरानने इस्रायली भूभागाच्या दिशेने क्षेपणास्त्रांची नवीन मालिका डागली आहे. “हा धोका रोखण्यासाठी संरक्षण यंत्रणा कार्यरत आहेत,” असे सांगून, जनतेला जबाबदारीने वागण्याचे आणि निर्देशांनुसार कृती करण्याचे आवाहन केले आहे.
कतार आणि इराणच्या परराष्ट्र मंत्री यांच्यात अमेरिका-इराण मध्यस्थीवर चर्चा
कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी सोमवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि इराण व अमेरिका यांच्यातील मध्यस्थीच्या प्रयत्नांवर चर्चा केली, असे कतार न्यूज एजन्सीने वृत्त दिले आहे.
https://twitter.com/QatarNewsAgency/status/2063857626379682190?s=20
येमेनच्या हौथींकडूनही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले
येमेनच्या इराण-समर्थित हौथींनी सोमवारी इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. या गटाच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, क्षेपणास्त्रांनी आपले लक्ष्य साधले आहे.
आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सर्व आघाड्यांवर व्यापक कारवाईसाठी सज्ज आहोत - इराण
इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असून सर्व आघाड्यांवर व्यापक कारवाया सुरू करू शकतात, असे सरकारी वृत्तसंस्था 'फर्स'ने म्हटले आहे. अलीकडील इस्रायली हल्ल्यांनंतर या प्रदेशात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे.
इराणकडून इस्रायलमधील नेवातिम आणि तेल नोफ हवाई तळांना लक्ष्य
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने सोमवारी सांगितले की, त्यांच्या हवाई दलाने इस्रायलच्या नेवातिम आणि तेल नोफ हवाई तळांना लक्ष्य करून एक मोहीम सुरू केली आहे. आयआरजीसीने म्हटले आहे की, इराणमधील तीन ठिकाणी असलेल्या अनेक रडार केंद्रांवर इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही मोहीम राबवण्यात आली. गार्ड्सने सांगितले की, ते सर्व आघाड्यांवर व्यापक कारवायांसाठी पूर्णपणे तयार आहेत.
“निर्णय मीच घेणार”, इराण-इस्रायल संघर्षावर ट्रम्प आक्रमक; बिन्यामिन नेतान्याहूंना सुनावलं
इराण आणि इस्रायल यांनी पुन्हा एकदा हल्ले सुरू केलेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया समोर येत आहे. हा संघर्ष थांबवण्याचा इशारा अमेरिकेने इस्रायलला दिला असून नेतान्याहू यांच्याकडे कोणताही पर्याय नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. वॉशिंग्टन आणि इराण यांच्यात मध्य पूर्वेतील युद्ध संपवण्यासाठी जो काही करार होईल, तो स्वीकारण्याशिवाय इस्रायलच्या पंतप्रधानांकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असं ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. द फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘युद्धविरामा’ला तिलांजली, इस्रायल-इराण संघर्षाला पुन्हा सुरुवात; अमेरिका काय करणार?
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला ८ एप्रिल रोजी विराम देण्यात आला होता. आता बरोबर दोन महिन्यांनी इराणने पुन्हा एकदा इस्रायलविरोधात हल्ले सुरू केले आहेत. इराणने रविवारी रात्री उत्तर इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. तर, इस्रायलनेही प्रतिहल्ला केला आहे.
Iran-Israel-US War Live : इस्रायलकडून इराणच्या पेट्रोकेमिकल कंपनीवर हल्ला; क्षेपणास्त्रामुळे प्लांटच्या काही भागाचं नुकसान
नैऋत्येकडील खुझेस्तान प्रांतातील एका सुरक्षा अधिकाऱ्याने फार्स वृत्तसंस्थेला सांगितले आहे की, इस्रायली सैन्याने महशहर शहरातील करुण पेट्रोकेमिकल कंपनीवर हल्ला केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, प्लांटच्या काही भागाचे नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानीची आणि जीवितहानीची माहिती नंतर जाहीर केली जाईल.

इराणचा इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला ताजा अपडेट (फोटो - Reuters)
Middle East War Live Updates : इराण-इस्रायल संघर्षातील लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या
