वृत्तसंस्था, दुबई
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी इराण शुल्क आकारत असल्याचे वक्तव्य आखाती सहकार्य मंडळाचे सरचिटणीस जासेम मोहंमद अल बुदैवी यांनी केले आहे. बुदैवी हे सहा अरब देशांच्या व्यवहारांकडे पाहतात. त्यात बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिरातीचा समावेश आहे. त्यांनी सौदी अरेबियात रियाध येथे पत्रकार परिषदेत वक्तव्य केले.

इराणच्या नौदलाचे प्रमुख आलिरिझा तांगझिरी ठार

जेरुसलेमः इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ नौदलाचे प्रमुख कमोडोर आलिरिझा तांगझिरी यांचा खात्मा केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमधील हालचालीवर ते लक्ष ठेवून होते. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी ही माहिती दिली. तांगझिरी यांच्यासह नौदलातील इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा इस्रायलने केलेल्या माऱ्यात खात्मा झाल्याचे ते म्हणाले. इराणने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

अन्य घडामोडी

  • इराणची होर्मुझ सामुद्रधुनीभोवतीची मूठ घट्टच
  • इस्रायल-इराणचे परस्परहल्ले सुरूच
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांचे तणाव निवळण्याचे आवाहन
  • इराणमधील १० हजारांहून अधिक ठिकाणांना आतापर्यंत लक्ष्य केल्याची अमेरिकेची माहिती
  • इराणबरोबरील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प चीनला मे महिन्यात भेट देणार