Iran Attack on Qatar LNG Plant: इराणकडून पर्शियन आखातातील ऊर्जा सुविधांवरील हल्ल्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कतारमधील जगातील सर्वात मोठ्या एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) निर्यात प्रकल्पावर इराणने गुरुवारी पहाटे क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात कतारच्या संकुलाचे मोठे नुकसान झाले आहे. इराणने एकूण पाच क्षेपणास्त्रे डागली त्यापैकी चार निरस्त करण्यात यश आले पण एक क्षेपणास्त्र एलएनजी प्रकल्पावर कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रास लाफानवर हल्ला
गुरुवारी पहाटे रास लाफानवर झालेल्या हल्ल्यामुळे आग लागली, कतारी प्रशासन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, वारंवार होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या सुरुवातीला जगात एलएनजी पुरवठ्याचा सुमारे पाचवा भाग असलेल्या प्रकल्पात उत्पादन थांबण्यात आले होते. हबशान येथील गॅस सुविधांचे नुकसान झाल्याने अबू धाबी प्रशासनाने ते बंद केले होते, अशी माहिती समोर आली आहे.
पार्सवर हल्ल्यानंतर चवथाळला इराण
इस्रायने इराणच्या महाकाय दक्षिण पार्स गॅस फिल्डवर हल्ला केल्यानंतर संतापलेल्या इराणने देखील प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिला होता. कतार, संयुक्त अरब आणि सौदी त्यांच्या पुढील लक्ष्य असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. गेल्या काही दिवसांपासून या आखाती भागातील तेल आणि गॅस सुविधांवर हल्ले केले जात आहेत. यामुळे जगभरात तेल आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल आहे शिवाय त्यांचा भाव देखील गगनाला भिडले आहेत.
एलएनजी पुरवठा, किंमतींवर प्रभाव
रास लाफानवर झालेल्या हल्ल्यात प्रकल्पाच्या नेमक्या कोणत्या भागाचे नुकसान झाले आहे याची माहिती समोर आलेली नाही. पण, यामुळे एलएनजीच्या किंमतीवर प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कतारने या हल्ल्याचा निषेध करताना हा हल्ला म्हणजे राष्ट्रीय सुरेक्षेवर घाला असल्याचे म्हटले आहे. कतारने इराणी सरकारी कार्यालयातील नागरिकांना २४ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
आशिया, युरोपला बसणार फटका
दरम्यान, या हल्ल्यात कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रास लाफान औद्योगिकशहर २९५ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारले असून, जगातील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पासह इतर गॅससंबंधित सुविधा देखील या ठिकाणी आहेत. या हल्ल्यामुळे आशिया आणि युरोपातील गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगतले जात आहे.
