Premium

इराणमध्ये हिजाबसक्ती अधिक कठोर; विरोधी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनंतर निर्णय 

२२ वर्षीय महसा अमिनी हिने हिजाब न घातल्यामुळे इराणच्या नैतिकता संरक्षक पोलीस दलाने तिला केलेल्या कथित बेदम मारहाणीनंतर तिचा मृत्यू झाला होता.

iran passes stricter hijab law
(संग्रहित छायाचित्र)

एपी, दुबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक ठिकाणी हिजाब परिधान करण्यास नकार देणाऱ्या महिलांना आणि त्यासाठी त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मोठा दंड ठोठावण्याची तरतूद असलेले विधेयक इराणच्या प्रतिनिधीगृहाने मंजूर केले आहे. यासंदर्भातील गुन्ह्यांसाठी दोषींना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

२२ वर्षीय महसा अमिनी हिने हिजाब न घातल्यामुळे इराणच्या नैतिकता संरक्षक पोलीस दलाने तिला केलेल्या कथित बेदम मारहाणीनंतर तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या इराणमध्ये काही महिने हिजाबविरोधी आंदोलन चिघळले होते. महिलांनी आणि महिला हक्कांच्या समर्थकांनी सरकारविरोधात व्यापक आंदोलने केली होती. त्यात हिंसाचार झाला होता. या घटनेला एक वर्ष लोटल्यानंतर काही दिवसांनी इराण सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> कॅनडात आणखी एका गुंडाची हत्या; टोळीयुद्धाचा परिणाम

तरतूद काय?

* हिजाब परिधान न केल्यास मोठा दंड.

* हिजाब परिधान न केलेल्या महिलेस वस्तूंची विक्री करणाऱ्यांनाही शिक्षा. * या विधेयकाविरोधात आंदोलन केल्यास त्यांनाही कठोर शिक्षा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iran passes stricter hijab law days after protest anniversary zws

First published on: 21-09-2023 at 23:32 IST
Next Story
कावेरी वादात हस्तक्षेप नाही; पाणीवाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका