Iran President Masoud Pezeshkian warns : इस्लामिक प्राजसत्ताक इराणने आज पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत युद्ध संपवण्याकरता अमेरिकेला प्रस्ताव पाठवला असल्याचं वृत्त सरकारी वृत्तसंस्था IRNA ने दिलं आहे. यावरून इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे. प्रस्ताव पाठवला म्हणजे शरण आलो आहे, असं नाही, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय.

ही शरणागती नाही

एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले, चर्चा किंवा वाटाघाटी म्हणजे शरणागती पत्करणे किंवा माघार घेणे नव्हे. इराणी जनतेचे हक्क सुरक्षित करणे आणि राष्ट्रीय हितांचे खंबीरपणे रक्षण करणे हा उद्देश आहे. पुनर्रचना आणि नुकसान भरपाईच्या प्रयत्नांदरम्यान, बाधित कुटुंबांना मानसिक आधार देणे आणि त्यांची मनःशांती पुनर्संचयित करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

सार्वभौमत्त्वाच्या तत्वांना सध्याच्या भू राजकीय परिस्थितीशी जोडून पेझेश्कियन यांनी यावर जोर दिला की इस्लामिक प्राजसत्ताक सामर्थ्यशाली स्थानासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी नमूद केलं की, कोणत्याही राजनैतिक संबंधांमागील मुख्य उद्दिष्ट लोकांची सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित करणं हे आहे.”

इराणी जनतेच्या हक्कांचे रक्षण करणे आणि दृढ शक्तीने राष्ट्रीय हितांचे संरक्षण करणे हे उद्दिष्ट आहे, असं पेझेश्कियान पुढे म्हणाले. दरम्यान, या उच्चस्तरीय वक्तव्याबरोबरच एक औपचारिक राजनैतिक पाऊलही उचलण्यात आलंय. इराणने पाकिस्तानमार्फत प्रादेशिक संघर्ष कमी करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर आपली प्रतिक्रिया सादर केली, असं इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी जाहीर केलं.

अल जझिराच्या वृत्तानुसार तेहरानने तयार केलेल्या आणि यापूर्वीच समोर आलेल्या १४ कमी योजनेमुळे या चर्चांची गरज अधोरेखित झाली आहे. या वृत्तवाहिनीने म्हटलंय की इराणी रणनीती तीन मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. यामुळे तात्पुरत्या युद्धविरामाचे युद्धाच्या संपूर्ण समाप्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी ३० दिवसांच्या टप्प्याचा समावेश आहे. ही चौकट अमेरिकेने यापूर्वी मांडलेल्या नऊ कलमी शांतता योजनेला थेट प्रत्युत्तर म्हणून सादर करण्यात आली होती.

इराणच्या मसुद्यात अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठवावेत आणि इराणी बंदरावंरील नाकेबंदी संपुष्टात आणावी अशा विशिष्ट मागण्यांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर या प्रस्तावात अमेरिकेने या प्रदेशात आपेल सैन्य मागे घ्यावे आणि सर्व शत्रुत्व थांबवावे असा आग्रह धरण्यात आला आहे, यात लेबनॉनमधील इस्रायलचे युद्ध संपवण्याचा मागणीचाही समावेश आहे.