Iran vs USA Tension news: IRGC declares high alert as military standoff intensifies in the Middle East : इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अमेरिकेला पुन्हा एकदा गंभीर इशार दिला आहे. त्यांच्या तेलवाहू जहाजांवर किंवा व्यापारी जहाजांवर कोणताही हल्ला झाल्यास, या प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर आणि जहाजांवर हल्ले करून जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे आयआरजीसीने म्हणटले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ तणाव कायम असताना हा इशारा देण्यात आला आहे.
सरकारी वृत्तसंस्था आयआयआयबी न्यूजने आयआरजीसीचे नौगृल कमांडर्सच्या हवाल्याने म्हटले आहे की, “इराणी तेलवाहू जहाजांवर आणि व्यापारी जहाजांवर झालेल्या कोणत्याही हल्ल्याला या प्रदेशातील अमेरिकन तळांपैकी एकावर आणि शत्रूच्या जहाजांवर व्यापक हल्ल्याच्या स्वरूपात प्रत्युत्तर दिले जाईल.”
“कोणत्याही हल्ल्याला व्यापक स्वरूपाच्या हल्ल्याने प्रत्युत्तर दिले जाईल,” असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
इराण आणि अमेरिकन सैन्यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जवळपासच्या प्रदेशात झालेल्या काही चकमकींनंतर हा इशारा देण्यात आला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, शुक्रवारी इराणी सैन्य आणि अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांमध्ये संघर्ष झाला. त्यानंतर परिस्थिती निवळल्याचे सांगण्यात आले असले तरी अशा प्रकारचा संघर्ष पुन्हा होण्याची भीती आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम अजूनही लागू असल्याचे सांगितले आहे.
आयआरआयबीने स्वतंत्रपणे प्रसारित केलेल्या दुसऱ्या एका निवेदनात, एका वरिष्ठ इराणी कमांडरने इराणचे लष्करी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
“या प्रदेशातील अमेरिकन लक्ष्यांवर आणि आक्रमण करणाऱ्या शत्रूच्या जहाजांवर आयआरजीसीची क्षेपणास्त्रे आणि एरोस्पेस ड्रोन्स रोखले गेले आहेत,” असे जनरल सरदार मौसवी म्हणाले. “आम्ही फक्त गोळीबार करण्याच्या आदेशाची वाट पाहत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या प्रस्तावाचा इराणकडून आढावा
इराणी अधिकार्यांनी सांगितले की, ते अमेरिकेकडून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाचा आढावा घेत आहेत. असे असले तरी त्यांनी ताज्या घडामोडींमुळे याबाबत अविश्वास व्यक्त केला. अली सफारी म्हणाले की, इराणला राजनैतिक माध्यमांतून असा मेसेज मिळाला आहे की अमेरिकेला हा संघर्ष अधिक वाढवायचा नाहीये.
नाकेबंदीमुळे नुकसान नाही?
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने गेल्या महिन्यात इराणी बंदरांची नाकेबंदी केली आहे. मात्र, आणखी चार महिने तरी या नाकेबंदीमुळे इराणचे नुकसान होणार नाही, असे सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने सूचित केले आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अमेरिकी अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे, सीआयएच्या विश्लेषणासंबंधी केले जाणारे दावे खोटे असल्याचे एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले.
