How Iran tracked US soldiers location In Middle East: लष्करी क्षमतांच्या बाबतीत इराण अमेरिकेच्या तुलनेत दुबळा असला तरी, अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरु असताना देखील इराण जुमानत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. अलिकडे अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा संघर्ष चिघळला असून, इराणच्या अनेक महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. इराणकडून देथील प्रत्युत्तरदाखल जोरदार प्रतिसाद दिला जात आहे. आखाती देशातील अमेरिकी सैन्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इराण डेटा रोमिंग आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
सायबर तज्ज्ञ गॅरी मिलर काय म्हणाले?
इराणी हँकर्सनी मध्य पूर्वेतील कमजोर टेलिकॉम सुविधांचा वापर अमेरिकी अधिकारी, जवान आणि कंत्राटदारांची ठिकाणे शोधण्यासाठी केला. मोबाईल पडताळणी आणि संशोधनातून ही बाब उघड झाली आहे. मध्य पूर्वेतील टेलिकॉम नेटवर्कवरती अनेक प्रकारच्या रिक्वेस्ट आल्याचे आढळून आले, विशेषत: नेटवर्क कक्षेच्या बाहेर असणाऱ्या मोबाईलवरती या रिक्वेस्ट आल्याचे आढळून आले आहे. सायबर तज्ज्ञ गॅरी मिलर यांनी याबाबत न्यू यॉर्क टाईम्सला माहिती देताना हा डेटा संलग्न हल्ल्याचा सूचक असल्याचे म्हटले आहे.
अशी शोधली अमेरिकी जवानांची ठिकाणं
अमेरिकेने बहारीनसह मध्य पूर्वेत दहा हजाराहून अधिक सैनिकांना तैनात केले आहे. मिलर यांच्या मतानुसार, टेलिकम्युनिकेशन नेटवर्कवरती मोठ्या संख्येने एसएस७ या रिक्वेस्टची गर्दी पाहायला मिळाली. जागतिक टेलिकम्युनिकेशन नेटवर्कच्या माध्यमातून टार्गेट फोन्सचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी वापरण्यात आले. तसेच, हे फोन सक्रिय आहेत का? याचीही खातरजमा करण्यात आली. इराणने त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अमेरिकी अधिकाऱ्यांचे ठिकाण शोधण्यासाठी वापर केल्याचे वृत्त फायनाशियल एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे.
इराणकडून तंत्रज्ञानाचा अचूक वापर
“इराणकडे लोकेशनची रिअल-टाईम, तत्काळ आणि सातत्याने माहिती गोळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मला याबाबत अजिबात आश्चर्य वाटत नाही की इराणने अमेरिकी अधिकाऱ्यांचे लोकेशन ट्रक करण्यासाठी एसएस७ या रिक्वेस्टचा वापर केला नसेल”, असे मिलर न्यू यॉर्क टाईम्सला माहिती देताना म्हणाले आहेत. ट्रकिंगचे काही प्रयत्न ब्लॉक करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवताना मिलर यांनी याचा संबंध इराणशी जोडला. दरम्यान, इराणने इराकमधील विविध हॉटेल्सवर, बहारीनमधील अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला केला आहे. काही वेळेस इराणने अमेरिकेचे कंत्राटदार आणि नागरिकांवर देखील हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.
अमेरिकेला भीती
इराणने टार्गेट शोधण्यासाठी मोबाईल नेटवर्कचा वापर केल्याचे निरीक्षण सायबर तज्ज्ञ निकिता शाह यांनी न्यू यॉर्क टाईम्सशी बोलताना नोंदवले. फोनची निर्मिती करणाऱ्यांकडून स्मार्टफोनवर येणाऱ्या जाहीरातींच्या आयडीमुळे फोनचे लोकेशन ट्रॅक करणे सोपे जाते, दरम्यान, अमेरिकेने टेक कंपन्यांवर जवानांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला आहे. पण, पाळत असल्याचे उघड झाल्यानंतर अमेरिकेने सैन्याला माघारी बोलावले असल्याचे सांगितले जाते. इराणकडून एसएस७ चा वापर केला जात असल्याचे अमेरिकेने अधोरेखित केले आहे. इराणची क्षमता लक्षात घेता त्यांनी डेटाचा व्यवस्थित वापर केल्याचा याचे गंभीर परिणाम दिसतील, असे मत पॅट हॅरीगन यांनी फायनाशियल एक्सप्रेसशी बोलताना नोंदवले.
