Iran इस्त्रायल आणि इराणमधला संघर्ष नुसता वाढला नाहीये तर शिगेला पोहचला आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट केलं आहे. दुसरीकडे इराणनेही इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायलने इराणमधल्या तेल डेपोंना लक्ष्य केलं आहे. त्यावर हवाई हल्ले झाल्याने हा संघर्ष वाढला आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा देखील खात्मा झाला. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे. दरम्या आता इराणने सगळ्या नागरिकांना What’s App डिलिट करा असा आदेशच दिलाय.

इराणचा नेमका आदेश काय?

इराण सरकारच्या वृत्तसंस्थेने मंगळवारी दुपारी लोकांना त्यांच्या स्मार्टफोनवरून व्हॉट्सअॅप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. Whats App वरील माहितीचा उपयोग इस्राएलला पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो असं सांगत हे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान याबाबत इराण सरकारने Whats App कडे किंवा Meta कडे कुठलीही विचारणा केलेली नाही. असं मेटा कंपनीने म्हटलंय. शिवाय व्हॉट्स अॅपवर होणारे चॅट आणि त्यातील माहिती कुणीही मध्यस्थ वाचू शकत नाही. एंड टू एंड एनक्रिप्शन हे त्याचसाठी सुरु करण्यात आलं आहे. ‘आम्ही कोणत्याही सरकारला मोठ्या प्रमाणात माहिती पुरवत नाही.’ असंही व्हॉट्स अॅपने म्हटलं आहे.

Whats App ने फेटाळले इराणचे दावे

मेटाच्या प्रवक्त्यांनी इराण सरकारने व्हॉट्स अॅप बाबत केलेले दावे फेटाळले आहेत. आम्ही कोणत्याही सरकारला माहिती प्रदान करत नाही. मेटाने नियमितपणे याबाबतचे अहवालही प्रसिद्ध केले आहेत. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फिचर तयारच यासाठी केलं आहे की दोन व्यक्तींमधला संवाद त्यांच्यातच रहावा. व्हॉट्स अॅपवर जेव्हा दोन व्यक्तींचा संवाद सुरु असतो तेव्हा तो तिसऱ्या कुणालाही वाचता येत नाही. दरम्यान या सगळ्या संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प इराणला इशारा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिला?

इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावर एक पोस्ट करत इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याबाबत आतापर्यंतचं सर्वात मोठं विधान केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला माहित आहे की तथाकथित सर्वोच्च नेते (इराणचे सर्वोच्च नेते) कुठे लपले हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. ते सोपे टार्गेट आहेत, पण ते तिथे सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढणार नाहीत (मारणार नाही!)किमान सध्या तरी नाही.पण आम्हाला नागरिकांवर किंवा सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. पण आमचा संयम सुटत चालला आहे”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.