इराणमध्ये फुटबॉल सामना पाहणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तरुणीने पोलीस व्हॅनमध्ये बसलेला आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यानंतर अनेकजण तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट चेक करत आहेत. झिनाब असं या तरुणीचं नाव आहे.
झिनाबने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामधील एक सेल्फी तिने स्टेडिअममध्ये काढलेला आहे. या फोटोत तिने टोपी घातली असून चेहरा झाकलेला दिसत आहे.
इराणमध्ये महिलांना स्टेडिअममध्ये जाऊन पुरुषांचा फुटबॉल सामना पाहण्याची परवानगी नाही. मात्र त्या महिलांना खेळताना सामना पाहू शकतात. इराणमध्ये महिलांच्या सार्वजनिकरीत्या फुटबॉ़ल मॅच पाहण्यावर कट्टरतावाद्यांनी तब्बल चाळीस वर्षांपासून बंदी घातली आहे.
View this post on Instagram
मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iranian girl taken in custody for watching football match