पाकिस्तानी गुप्तर यंत्रणेचा एजंट म्हणून काम करणाऱ्याला नेपाळमध्ये ठार करण्यात आलं आहे. १९ सप्टेंबरला काठमांडूमध्ये आश्रय घेतलेल्या ठिकाणाबाहेर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, तो भारतात आयएसआयच्या बनावट नोटांचा सर्वात मोठा पुरवठादार होता.

ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये काही अज्ञात हल्लेखोर आयएसआय एजंटवर गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. त्याची ओळख पटली अशून लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी असं नाव आहे.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
massive fire broke out in a slum in Bhayanders Azad Nagar
भाईंदरच्या आझाद नगर मध्ये झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

आयएसआयच्या सांगण्यावरुन, लाल मोहम्मद पाकिस्तान, बांगलादेशमधून बनावट भारतीय चलन आधी नेपाळमध्ये आणायचा आणि नंतर भारतामध्ये पुरवठा करायचा. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल मोहम्मदचे संबंध अंडरवर्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या डी-गँगशीदेखील होते. त्याने आयएसआयच्या इतर एजंट्सनाही आश्रय दिला होता.

सीसीटीव्हीत काय ?

सीसीटीव्हीत लाल मोहम्मद काठमांडूमधील आपल्या घराबाहेर आलिशान गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. यानंतर काही वेळातच दोन हल्लेखोर त्याच्यावर गोळीबार सुरु करतात. लाल मोहम्मद गाडीच्या मागे लपून जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण हल्लेखोर गोळीबार करत राहतात.

सीसीटीव्हीत लाल मोहम्मदची मुलगी पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन वडिलांच्या दिशेने धाव घेताना दिसत आहे. पण ती पोहोचेपर्यंत हल्लेखोर त्याला ठार करुन पळून जाण्यात यशस्वी झालेले असतात.