इसिसशी कनेक्शन असलेल्या आरोपीला १६ ऑगस्टपर्यंत NIA कोठडी, जाणून घ्या नेमकं प्रकरण

इस्लामिक स्टेट (IS) चा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिल्ली न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

इसिसशी कनेक्शन असलेल्या आरोपीला १६ ऑगस्टपर्यंत NIA कोठडी, जाणून घ्या नेमकं प्रकरण
इसिसशी कनेक्शन असलेल्या आरोपीला १६ ऑगस्टपर्यंत NIA कोठडी

इस्लामिक स्टेट (IS) चा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिल्ली न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. मोहसीन अहमद असं या आरोपीचं नाव असून तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. आरोपी मोहसीन अहमद याला एनआयएने शनिवारी बाटला हाऊस येथून अटक केली होती. सोमवारी त्याला दिल्ली न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

इसिस संघटनेशी संबंध असल्याच्या कारणातून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) २५ जून रोजी एक गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, एनआयने शनिवारी देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली. आरोप मोहसीन अहमद याच्या ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर त्याला बाटला हाऊस येथून अटक करण्यात आली.

हेही वाचा- NIA ची मुंबईत मोठी कारवाई! दाऊद इब्राहिमचा सहकारी छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक, राजकीय नेत्यांवर हल्ल्याचा होता कट

एनआयएनं रविवारी जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटलं की, “आरोपी मोहसीन अहमद हा ISIS संघटनेचा कट्टरपंथी आणि सक्रिय सदस्य आहे. इसिसला पाठिंबा देणाऱ्या भारतातील तसेच परदेशातील नागरिकांकडून निधी गोळा करणे आणि तो निधी सीरियाला पाठवणे, यामध्ये मोहसीनचा सहभाग आहे. तो लोकांकडून गोळा केलेला निधी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सीरिया आणि इतर ठिकाणी पाठवत होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘’काही खटले हरल्यानंतर…”कपिल सिब्बलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बार काऊंन्सिल अध्यक्षांचा पलटवार
फोटो गॅलरी