मोदी, पर्रिकर यांना ‘आयसिस’ची धमकी

पोस्टकार्डाद्वारे ही धमकी देण्यात आली असून ते स्थानिक टपाल कार्यालयातून आले आहे.

पर्रिकर, मोदी

गोमांसावर बंदी घातल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना धमकी देणारे निनावी पत्र ‘आयसिस’ने पाठविले असून गोवा पोलिसांनी त्याबाबत तपास सुरू केला आहे.

गृह आणि सामान्य प्रशासन विभागाकडे हे पत्र पाठविण्यात आले होते. आपण गोहत्याबंदी केली आहे, आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे, असे पोलीस महानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनी सांगितले.

गोमांस सेवन करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे, तुम्हाला पाहून घेऊ असेही मोदी आणि पर्रिकर यांचा संदर्भ देऊन म्हटले आहे. पोस्टकार्डाद्वारे ही धमकी देण्यात आली असून ते स्थानिक टपाल कार्यालयातून आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Isis letter threatens manohar parrikar and modi

ताज्या बातम्या