BREAKING : ISISचा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू | isis terrorist group leader abu Hasan al Hashimi al Qurashi killed in battle breaking news rmm 97 | Loksatta

BREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा मृत्यू झाला आहे.

BREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू
संग्रहित फोटो-रॉयटर्स

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा मृत्यू झाला आहे. एका युद्धादरम्यान, कुरेशीचा मृत्यू झाल्याची माहिती इसिस संघटनेनं जाहीर केली आहे.

वृत्तसंस्था ‘एएफपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, इसिसच्या प्रवक्त्याने सांगितलं की, आमचा नेता कुरेशी देवांच्या शत्रूंशी लढताना युद्धात मारला गेला आहे. पण कुरेशीच्या मृत्यूची नेमकी तारीख किंवा दिवस याबाबत कोणतीही माहिती इसिसकडून देण्यात आली नाही. या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने एक ऑडिओ संदेश जारी करत ही माहिती दिली असून इसिसच्या नवीन नेत्याच्या नावाची घोषणाही केली आहे.

हेही वाचा- पाकिस्तानच्या ISI गुप्तचर यंत्रणेत काम केलेल्या अधिकाऱ्याच्या हाती लष्कराची धुरा; बाजवांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची घोषणा

अबू अल-हुसेन अल-हुसेनी अल-कुरेशी हा ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ या गटाचा नवीन नेता असणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेनं उत्तर सीरियातील इदलिब प्रांतात हवाई हल्ला करत इसिसचा याआधीचा नेता अबू इब्राहिम अल-कुरेशी याला ठार केलं होतं. त्याआधीचा इसिस नेता अबू बक्र अल-बगदादी हाही ऑक्टोबर २०१९ मध्ये इदलिबमध्येच मारला गेला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 22:29 IST
Next Story
Ravish Kumar Resign : पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली