युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘इस्कॉन’ने पूर्व युरोपीय देशातील गरजू लोकांसाठी मंदिरांचे दरवाजे उघडले आहेत. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी शनिवारी सांगितले की, “युक्रेनमधील इस्कॉन मंदिरे गरजू लोकांच्या सेवेसाठी तयार आहेत. आमचे भक्त आणि मंदिरे संकटात सापडलेल्या लोकांच्या सेवेसाठी कटिबद्धआहेत. आमच्या मंदिरांचे दरवाजे सेवेसाठी खुली आहेत.

Russia-Ukrain War Live: “पुतीन यांनी ही शोकांतिका लपवू नये”

इस्कॉनची युक्रेनमध्ये ५४ पेक्षा जास्त मंदिरे आहेत आणि आमचे भक्त आणि मंदिरे इतरांना जमेल तशी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. राधारमण म्हणाले, “आज सकाळी आम्हाला कीवमधील आमच्या भक्तांकडून माहिती मिळाली आणि भगवान कृष्णाच्या कृपेने ते सर्व सुरक्षित आहेत आणि आमची ५४ मंदिरेही सुरक्षित आहेत.”

“युक्रेनमधील आमचे इस्कॉन भक्त खरोखरच एक पाऊल पुढे आहेत. या कठीण काळात आमचे भक्त स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांची सेवा करण्यात व्यस्त आहेत”, इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष म्हणाले.

Ukraine-Russia War : २४० भारतीयांना घेऊन तिसरे विमान बुडापेस्टहून दिल्लीला पोहोचले

तर, युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आलेले तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तर, मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे मायदेशी परतल्याचा आनंद युक्रेनमधून आलेल्या भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.