Israeli military carried out multiple airstrikes on Hezbollah’s central headquarters : इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने शुक्रवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमधील हेजबोलाच्या मुख्यालयावर आणखी एक प्राणघातक हवाई हल्ला केला. सूत्रांनी दावा केला की इराण-समर्थित दहशतवादी गटाचा प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह या मुख्यालयात होता. या हल्ल्यामुळे हेजबोलाबरोबरील संघर्षाचे रूपांतर मोठ्या युद्धात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, Axios ने दिलेल्या वृत्तानुसार, हेजबोलाचा नेता हसन नसराल्लाह हा या स्ट्राइकचा लक्ष्य होता. त्यामुळे या हल्ल्यात तो ठार झालाय की नाही याची माहिती घेतली जात आहे.
“Moments ago, the Israel Defense Forces carried out a precise strike on the Central Headquarters of the Hezbollah terror organization…taking the necessary action to protect our people so that Israeli families can live in their homes, safely and securely.”
— Israel Defense Forces (@IDF) September 27, 2024
Listen to IDF… pic.twitter.com/I4hbN7KkO8
हेजबोलाच्या मुख्यालयावर अचूक स्ट्राईक
इस्रायली सैन्याने जाहीर केले की त्यांनी हिजबुल्लाच्या मध्यवर्ती मुख्यालयावर “अचूक स्ट्राइक” केले. या हल्ल्यात कमीतकमी सहा इमारती नष्ट झाल्या असून यामुळे इराण-समर्थित गटाशी संघर्षात मोठी वाढ झाली. किमान दोन जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले, असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
हेही वाचा >> “लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?
नसराल्लाहचा मृत्यू की जिवंत?
हेजबोलाच्या एका सूत्राने दावा केला की नसराल्लाह जिवंत आहे. तर इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेनेही त्याच्या सुरक्षिततेचा अहवाल दिला आहे. परंतु, इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की नसराल्लाहविषयी अधिक माहिती घेतली जात आहे.
Israel launched its largest attack on Beirut to date. Several high-rise buildings were leveled to the ground. No information yet about the number of dead or injured. The attack allegedly targeted Hezbollah leader Hassan Nasrallah. Hezbollah has not yet made a statement. pic.twitter.com/LHNq4ap04m
— Memet Aksakal (@aksakal_memet) September 27, 2024
एअर स्ट्राईकमुळे जीवित आणि वित्त हानी
हेजबोलाच्या अल-मनार टेलिव्हिजनने वृत्त दिले की चार इमारती उद्ध्वस्त झाल्या, स्ट्राइकमुळे अनेक जीवितहानी झाली. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेक इमारती ढिगाऱ्याखाली गेल्या, त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि बेरूतच्या उत्तरेस सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील घरे हादरली.
“काही क्षणांपूर्वी, इस्रायल संरक्षण दलांनी हेजबोला दहशतवादी संघटनेच्या मध्यवर्ती मुख्यालयावर अचूक स्ट्राइक करण्यात आला. आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आवश्यक कारवाई केली. जेणेकरून इस्रायली कुटुंबे त्यांच्या घरात, सुरक्षितपणे राहू शकतील”, असं IDF चे प्रवक्ते डॅनियल हगरी म्हणाले.