Israel Election Results Updates: इस्रायलच्या राजकारणात सध्या अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत असून पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. २७ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही एका गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकत्र येत नेतान्याहू यांना सत्तेवरून हटवण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे.

इस्रायलमधील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी माजी लष्करप्रमुख आणि ‘याशार’ पक्षाचे प्रमुख गादी आयसेनकोट यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर केला आहे. हरझलिया येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी नेत्यांची ही पहिलीच एकत्र बैठक होती, ज्यामध्ये नेतान्याहू यांचे सरकार शक्य तितक्या लवकर उलथवून टाकून देशात ‘राष्ट्रीय आपत्कालीन सरकार’ स्थापन करण्यावर एकमत झाले आहे. इस्रायलमधील सत्ता स्थापनेचे सर्व काही अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

आकड्यांचे गणित काय सांगते? 

इस्रायलच्या १२० जागांच्या संसदेत बहुमताचा आकडा ६१ आहे. मात्र, या निवडणुकीत दोन्ही मुख्य गटांची अवस्था त्रिशंकू झाली आहे:

नेतान्याहू गट: ५३ जागा

विरोधी आघाडी (आयसेनकोट गट): ४८ जागा

अरब आघाडीचे पक्ष: १९ जागा

दोन्ही प्रमुख गटांना सत्ता स्थापनेसाठी ६१ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे १९ जागा जिंकणारे अरब बहुल पक्ष आता या राजकारणात ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आले आहेत.

Live Updates

Israel Election Vote Counting Final Results and Government Formation | इस्रायल सत्तास्थापनेच्या ताज्या घडामोडी

19:53 (IST) 4 Nov 2026

अरब बहुल पक्ष आता ‘किंगमेकर’च्या भूमिकेत

इस्रायलच्या १२० जागांच्या संसदेत बहुमताचा आकडा ६१ आहे. मात्र, या निवडणुकीत दोन्ही मुख्य गटांची अवस्था त्रिशंकू झाली आहे:

नेतान्याहू गट: ५३ जागा

विरोधी आघाडी (आयसेनकोट गट): ४८ जागा

अरब आघाडीचे पक्ष: १९ जागा

दोन्ही प्रमुख गटांना सत्ता स्थापनेसाठी ६१ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे १९ जागा जिंकणारे अरब बहुल पक्ष आता या राजकारणात ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आले आहेत.

19:10 (IST) 4 Nov 2026

बोगस मतदानाचा दावा फेटाळला

नेतान्याहू यांनी अरब पक्षांनी निवडणूक "चोरी" केल्याचा आणि बोगस मतदान घडवून आणल्याचा आरोप पुराव्यांशिवाय केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावत निवडणुकीत कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे.

18:40 (IST) 4 Nov 2026

विरोधक एकवटले, नेतान्याहूंची सत्ता धोक्यात

३ नोव्हेंबर रोजी हरझलिया येथे इस्रायलच्या प्रमुख विरोधी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेतान्याहू यांचे सरकार जितक्या लवकर शक्य होईल तितके लवकर हटवून गॅडी आयझेनकोट यांना पंतप्रधान बनवण्यावर विरोधकांची सहमती झाली आहे.

18:20 (IST) 4 Nov 2026

परदेशी हस्तक्षेपाचे आरोप

निवडणूक प्रक्रियेदरम्यान परदेशी घटकांकडून मोठ्या प्रमाणात निधीचा वापर करून मतदारांवर आणि निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी गुप्तचर संस्था 'शिन बेट' सध्या कसून तपास करत आहे.

अ‍ॅटर्नी जनरल यांनी या तपासादरम्यान कायदेशीर मर्यादांचे आणि राजकीय लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शिन बेट प्रमुख डेव्हिड झिनी यांनी या निर्देशांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्यामुळे तपास प्रक्रियेला आता कायदेशीर आणि तांत्रिक चौकट प्राप्त झाली आहे.

केंद्रीय निवडणूक समितीने मतमोजणीत किंवा प्रत्यक्ष मतदानात कोणतीही फेरफार झाल्याचा दावा फेटाळून लावला असला, तरी या चौकशीच्या निकालाकडे संपूर्ण इस्रायलसह आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागून राहिले आहे.

17:44 (IST) 4 Nov 2026

इस्रायलमधील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा माजी लष्करप्रमुख आणि ‘याशार’ पक्षाचे प्रमुख गादी आयसेनकोट यांना पाठिंबा जाहीर

इस्रायलमधील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी माजी लष्करप्रमुख आणि ‘याशार’ पक्षाचे प्रमुख गादी आयसेनकोट यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर केला आहे. हरझलिया येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी नेत्यांची ही पहिलीच एकत्र बैठक होती, ज्यामध्ये नेतान्याहू यांचे सरकार शक्य तितक्या लवकर उलथवून टाकून देशात ‘राष्ट्रीय आपत्कालीन सरकार’ स्थापन करण्यावर एकमत झाले आहे.

16:53 (IST) 4 Nov 2026

नेतान्याहू यांना सत्तेवरून हटवण्यासाठी मोठी रणनीती

इस्रायलमधील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी माजी लष्करप्रमुख आणि ‘याशार’ पक्षाचे प्रमुख गादी आयसेनकोट यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर केला आहे. हरझलिया येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. दोन्ही प्रमुख गटांना सत्ता स्थापनेसाठी ६१ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे १९ जागा जिंकणारे अरब बहुल पक्ष आता या राजकारणात ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आले आहेत.

16:32 (IST) 4 Nov 2026

सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे वेगाने हालचालींचे संकेत

स्वीकृत करण्यात आलेले हे निवडणूक निकाल बुधवारीच राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांच्याकडे सुपूर्द केले जातील. निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रपती तात्काळ विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू करतील. पंतप्रधानपदासाठी कोणत्या नेत्याला सर्वाधिक पक्षांचा पाठिंबा आहे, याची चाचपणी राष्ट्रपतींकडून केली जाईल. ज्या नेत्याच्या पाठीशी बहुमत किंवा सर्वाधिक प्रतिनिधींचे बळ असेल, त्यालाच राष्ट्रपती नवीन सरकार स्थापनेचे अधिकृत आमंत्रण देण्याची शक्यता आहे.

15:50 (IST) 4 Nov 2026

इस्रायलमधील निवडणूक निकाल अधिकृतपणे मान्य

इस्रायलमधील सत्ताधारी 'लिकूड' पक्षाने मतमोजणीत धांदल झाल्याचे गंभीर आरोप केले होते. असे असूनही, देशाच्या मध्यवर्ती निवडणूक आयोगाच्या अध्यक्षमंडळाने गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांना बुधवारी अंतिम मंजुरी दिली आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली.

15:14 (IST) 4 Nov 2026

अमेरिकन जनतेचा युद्धाला ‘नकार’! "इराण संघर्षाचा फटका रिपब्लिकन पक्षाला", ट्रम्प यांची जाहीर कबुली; इराणची प्रतिक्रिया काय?

स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनीही रिपब्लिकन पक्षाच्या पराभवामागे इराण युद्धाचा मोठा वाटा असल्याचे प्रामाणिकपणे मान्य केले आहे. ...अधिक वाचा
14:32 (IST) 4 Nov 2026

पंतप्रधान नेतान्याहूंचे आरोप फेटाळले

दरम्यान, इस्रायलच्या निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात पार पडलेल्या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार झाल्याचा पुरावा मिळालेला नाही, असे ठामपणे सांगितले आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अरब आघाडीच्या पक्षांनी मतमोजणीत आणि मतदानात "चोरी" केल्याचा वारंवार पुनरुच्चार केला होता. मात्र, असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नेतान्याहू किंवा त्यांच्या समर्थकांनी या आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही. निवडणूक आयोगाच्या या स्पष्टीकरणामुळे नेतान्याहू यांच्या दाव्यांमधील हवा निघून गेल्याचे मानले जात आहे.

14:29 (IST) 4 Nov 2026

इस्रायलच्या निवडणुकीत परदेशी हस्तक्षेप?

इस्रायलमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांच्या धुमाकुळात एका मोठ्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. देशांतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा 'शिन बेट' ने निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर परदेशी हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला आहे. या संशयित कारवाईत अथांग पैसा आणि हजारो लोकांचा वापर केला गेल्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे ‘वायनेट न्यूज’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

13:55 (IST) 4 Nov 2026

'जॉइंट लिस्ट'ची बाहेरून पाठिंब्याची तयारी, पण अटींवर

संसदेत ११ जागा असलेल्या 'जॉइंट लिस्ट'चे नेते युसेफ जबारीन यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, जोपर्यंत वेस्ट बँक भागावरील इस्रायलचा ताबा आणि लष्करी हस्तक्षेप सुरू राहील, तोपर्यंत ते थेट सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत. यासोबतच त्यांनी गाझा क्षेत्रातील युद्ध त्वरित थांबवून पॅलेस्टिनी नेत्यांशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

13:28 (IST) 4 Nov 2026

आकड्यांचे गणित काय सांगते? सत्ता स्थापनेची किल्ली 'अरब पक्षांच्या' हाती

इस्रायलच्या १२० जागांच्या संसदेत बहुमताचा आकडा ६१ आहे. मात्र, या निवडणुकीत दोन्ही मुख्य गटांची अवस्था त्रिशंकू झाली आहे:

नेतान्याहू गट: ५३ जागा

विरोधी आघाडी (आयसेनकोट गट): ४८ जागा

अरब आघाडीचे पक्ष: १९ जागा

दोन्ही प्रमुख गटांना सत्ता स्थापनेसाठी ६१ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे १९ जागा जिंकणारे अरब बहुल पक्ष आता या राजकारणात 'किंगमेकर'च्या भूमिकेत आले आहेत.

13:22 (IST) 4 Nov 2026

चेंडू राष्ट्रपतींच्या कोर्टात

इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हरझॉग यांनी ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकांनंतर राष्ट्रपती सत्ता स्थापनेसाठी पहिली संधी कोणाला देतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षांनी आयझेनकोट यांच्या नावाचे पत्र राष्ट्रपतींना देण्याचा निर्णय घेतला असला, तरी अरब पक्षांची साथ न मिळाल्यास ते सरकार कसे स्थापन करणार, हा मोठा प्रश्न आहे.

13:20 (IST) 4 Nov 2026

नेतान्याहूंचा मोठा दावा

दरम्यान, पराभवाच्या छायेत असलेल्या नेतान्याहू यांनी अद्याप हार मानलेली नाही. त्यांचा 'लिकुड' पक्ष २७ जागांसह संसदेतील सर्वांत मोठा पक्ष ठरल्याचा दावा करत नेतान्याहू यांनी 'सर्वसमावेशक राष्ट्रीय सरकार' स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, एकाही विरोधी नेत्याने त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यास सहमती दर्शवलेली नाही. याशिवाय नेतान्याहू यांनी स्वतः अरब पक्षांशी आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

13:19 (IST) 4 Nov 2026

विरोधी आघाडीतही मतभेद

नेतान्याहू यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले असले, तरी सत्ता समीकरणात अरब पक्षांना सहभागी करून घेण्यावरून विरोधकांमध्येही फूट पडली आहे.

विरोधी आघाडीतील नेते याइर गोलान यांनी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अरब पक्षांची मदत घेण्यास उघड पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, अव्हिग्डोर लिबरमन यांनी अरब पक्षांशी कोणत्याही प्रकारची हातमिळवणी करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. आयझेनकोट यांच्या स्वतःच्या चार मुख्य तत्त्वामांमुळं काही अरब पक्षांना या आघाडीतून बाहेरच राहावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Israel Election Results 2026 Live Updates| Netanyahu vs Gadi Eisenkot, Knesset Results

इस्रायल निवडणूक निकाल २०२६