scorecardresearch

इस्रायलचे संयुक्त राष्ट्रावर गंभीर आरोप, राजदूत म्हणाले, “त्यांच्यामुळे हमासने…”

इस्रायलने हमासबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रवर गंभीर आरोप केले आहेत. इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलाद एर्डन यांनी याबाबत इस्रायलमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठी विधानं केली.

Israel on United Nation Hamas War
इस्रायलचे संयुक्त राष्ट्रावर गंभीर आरोप (छायाचित्र सौजन्य – रॉयटर्स, एएनआय)

इस्रायलने हमासबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रवर गंभीर आरोप केले आहेत. इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलाद एर्डन यांनी याबाबत इस्रायलमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठी विधानं केली. यावेळी त्यांनी हमासचा खात्मा केल्यानंतर इस्रायल संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय शक्तीने गाझाचं नियंत्रण करण्याला विरोध करेल, अशी जाहीर भूमिका घेतली. तसेच सध्याच्या गाझातील परिस्थितीला संयुक्त राष्ट्रच जबाबदार असल्याचा आरोप केला.

इस्रायलचे राजदूत एर्डन म्हणाले, “संयुक्त राष्ट्रामुळेच गाझातील आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रानेच हमासला इस्रायल आणि जगाविरोधात गाझाचा उपयोग युद्ध मशीन म्हणून करण्यास मोकळीक दिली. इस्रायलने हमासविरोधातील युद्ध जिंकल्यावर संयुक्त राष्ट्राबरोबरच्या संबंधांवर इस्रायलने गंभीरपणे विचार केला पाहिजे.”

katraj doodh sangh chief bhagwan pasalkar avoided naming sharad pawar supriya sule praise ajit pawar
राष्ट्रवादीमधील दोन गटांना एकत्र आणण्यासाठी अजित पवारांना हात देणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
narendra modi Supriya sule
“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP Vidarbha
धनंजय मुंडेंचा ‘हा’ सल्ला सुप्रिया सुळेंना पटेल?
Trudeau father
वडिलांच्या पावलावर पाऊल? ट्रुडो पिता-पुत्रांचे भारताबरोबरचे संबंध नेहमीच वादग्रस्त का?

“संयुक्त राष्ट्राच्या त्या अधिकाऱ्यांचा विसा नाकारला पाहिजे”

“माझ्यामते संयुक्त राष्ट्रातील जे लोक आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहेत त्या काही अधिकाऱ्यांचा विसा नाकारला पाहिजे. ते हमासने सांगितलेलं खोटं पसरवत आहेत. त्यांच्यामुळे मागील १६ वर्षांपासून हमास संयुक्ता राष्ट्राच्या उपस्थितीत अनेक भयंकर गोष्टी करत आहेत,” असा गंभीर आरोप एर्डन यांनी केला.

“आम्ही गाझाच्या भविष्याबद्दल अरब देशांशी चर्चा करू”

इस्रायलला हमास या दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्यात आल्यानंतर आम्ही गाझाच्या भविष्याबद्दल अरब देशांशी चर्चा करू, असंही एर्डन यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही अरब देशांसाठी ही हमासची घाण साफ करण्याचं काम करत आहोत, असंही नमूद केलं.

हेही वाचा : रुग्णांना वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्येच राहिलेल्या डॉक्टरचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू

“हमासच्या खात्म्यानंतर गाझाचं अंतरिम सरकार चालवण्याबाबत…”

“हमासच्या खात्म्यानंतर गाझाचं अंतरिम सरकार चालवण्याबाबत अरब देशांसाठी लवकरच चर्च सुरू होईल. त्यात इस्रायलचाही सहभाग असेल. मला खात्री आहे की, हमास जशी आमची शत्रू आहे, तशीच ती अनेक अरब देशांचीही शत्रू आहे. हमास अनेक मुस्लीम देशांची शत्रू आहे,” असं मत एर्डन यांनी व्यक्त केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Israel envoy made serious allegations on united nation over war with hamas pbs

First published on: 18-11-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×