Premium

युद्धविरामानंतर इस्रायलचे गाझा पट्टीत जोरदार हल्ले; १७८ जणांचा मृत्यू

इस्रायलने शुक्रवारी युद्धविराम संपल्यानंतर गाझा पट्टीतील घरे आणि इमारतींना लक्ष्य करून, पुन्हा जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. ज्यात आतापर्यंत किमान  १७८ जण ठार झाले.

Israel heavy attacks in the Gaza Strip after the cease fire
युद्धविरामानंतर इस्रायलचे गाझा पट्टीत जोरदार हल्ले; १७८ जणांचा मृत्यू

एपी, खान युनूस (गाझा पट्टी)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रायलने शुक्रवारी युद्धविराम संपल्यानंतर गाझा पट्टीतील घरे आणि इमारतींना लक्ष्य करून, पुन्हा जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. ज्यात आतापर्यंत किमान  १७८ जण ठार झाले. आरोग्य मंत्रालयाने येथे ही माहिती दिली. इस्रायलनेही ‘हमास’च्या २०० हून अधिक स्थानांना लक्ष्य केल्याचा दावा केला. लेबनॉनच्या उत्तरेकडील सीमेवर इस्रायल आणि हिजबुल्लाह दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू असताना गाझामधील दहशतवाद्यांनी पुन्हा इस्रायलवर ‘रॉकेट’ डागले. नागरिकांच्या जिवाला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेने इस्रायलला नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

नुकत्याच समाप्त झालेल्या यद्धविरामात मध्यस्थी करणाऱ्या कतारने युद्धविराम पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. गत युद्धविरामात  इस्रायलने गाझामधील लष्करी हल्ले थांबवले आणि ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या  १०० नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात ३०० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. अद्यापही ११५ पुरुष आणि २० महिला आणि दोन मुले अजूनही ‘हमास’ने ओलीस ठेवली असल्याचा इस्रायलचा दावा आहे. शनिवारी इस्रायलचे हल्ले दक्षिण गाझामधील खान युनिस भागावर केंद्रित केले होते, जेथे आदल्या दिवशी रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्याचा इशारा देणारी पत्रके इस्रायली लष्कराने टाकली होती. तथापि  शुक्रवारी उशिरापर्यंत संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथून मोठय़ा संख्येने नागरिकांनी स्थलांतर केल्याचे  वृत्त मिळालेले नाही.

हेही वाचा >>>Election Results 2023: ३ डिसेंबरला देशातील ४ राज्यांचा निकाल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कसा बघायचा?

खान युनिसमध्ये आश्रय घेण्यासाठी एक महिन्यापूर्वी उत्तरेकडील बीट लाहिया या शहरातून आपली पत्नी आणि तीन मुलांसह पळून गेलेल्या इमाद हजरने आता कुठेही जाण्यासाठी आम्हाला जागा उरली नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी आम्हाला उत्तरेतून हाकलून दिले आणि आता ते आम्हाला दक्षिणेतून बाहेर पडण्यास भाग पाडत आहेत.  इस्रायलने युद्धाच्या सुरूवातीस जमिनीवरील प्रत्यक्ष लष्करी कारवाईपूर्वी स्थलांतरित होण्याचे आवाहन केल्यानंतर गाझाची जवळपास सर्वच लोकसंख्या – सुमारे २० लाख नागरिक गाझाच्या दक्षिणेकडे स्थलांतरीत झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Israel heavy attacks in the gaza strip after the cease fire amy

First published on: 03-12-2023 at 04:17 IST
Next Story
Election Results 2023: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाचा निकाल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कसा बघायचा?