Israel Attack Iran Today LIVE News Updates : इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिलं. इराणने इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक प्रमुख शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. तर, इस्रायलनेही इराणविरोधात ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ ही मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत इराणवर हल्ले केले जात आहेत.

शुक्रवारी पहाटने इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या अनेक लष्करी तळांना व इराणमधील आण्विक तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू झालं असल्याची घोषणा केली. पाठोपाठ इस्रायली हल्ल्यात इराणच्या लष्करातील अनेक मोठे अधिकारी व अणूशास्त्रज्ञ ठार झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री इराणने इस्रायलमधील अनेक शहरांवर १५० हून अधिक क्षेपणास्त्र डागली. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात मोहिमा उघडल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे.

Live Updates

Israel Iran Tension News Highlights : इस्रायल-इराण संघर्षात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स वाचा एकाच क्लिकवर.

21:10 (IST) 14 Jun 2025

Israel-Iran Conflict : 'चर्चेत भाग घेतला नाही', इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचा निषेध करणाऱ्या SCOच्या निवेदनावर भारताने स्पष्ट केली भूमिका

सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात जोरदार संघर्ष पेटला आहे, यादरम्यान भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...अधिक वाचा
19:53 (IST) 14 Jun 2025

'तर तेहरान जळेल', इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इराणला इशारा

इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्रायल काट्ज यांनी शनिवारी इराणाला जर तुम्ही क्षेपणास्त्र डागने सुरूच ठेवले तर तेहरान जळेल असा इशारा दिला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी रात्री इराममध्ये हल्ले केल्यानंतर त्याला उत्तर देत इराणने देखील इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर ही टिप्पणी आली आहे.

17:55 (IST) 14 Jun 2025

इस्त्रायलच्या हल्ल्यांनंतर अमेरिका-इराण यांच्यातील वाटाघाटी थांबल्या

इराणचा अणू कार्यक्रम रोखण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात अटींबाबत वाटाघाटी केल्या जात होत्या. मात्र इराणवर नुकतेच इस्त्रायलने हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशांमधील नियोजित चर्चा आता स्थगित करण्यात आली आहे. इस्त्रायलचा सहकारी असलेल्या अमेरिकेने इराणने डागलीली क्षेपणास्त्रे पाडण्यात मदत केल्याची माहिती दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

17:23 (IST) 14 Jun 2025

इराण अण्वस्त्रे बनवत नाही : तुलसी गबार्ड

इराण अण्वस्त्रे बनवत असून त्यांचे शास्त्रज्ञ लवकरच यात यश मिळतील, असे दावे अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केले होते. त्यासाठीचं पुरेसं युरेनियमही त्यांनी विकसित केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे मध्य-पूर्व आशियात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मात्र, आम्ही अण्वस्त्रे बनवत नाही, असं इराणने अनेकदा म्हटलं आहे. अशातच आता इस्रायल-इराण युद्ध सुरू झालं आहे. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी म्हटलं आहे की "इराण अण्वस्त्रे बनवत नाही. तुलसी यांनी हा दावा करताना अमेरिकन गुप्तचर यंत्रणेकडील माहितीचा हवाला दिला आहे".

17:09 (IST) 14 Jun 2025
"स्वातंत्र्यासाठी एकत्र या", नेतान्याहूंचा इराणी राजवटीविरोधात लढण्याचं जनतेला आवाहन

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याही यांनी इराणी जनतेला क्रूर व अत्याचारी राजवटीविरोधात पेटून उठण्याचं आवाहन केलं आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत एकत्र या, असंही त्यांनी म्हटलं आहे.

16:45 (IST) 14 Jun 2025

तीन इराणी अणूशस्त्रज्ञांचा मृत्यू

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात शनिवारी (१४ जून) तीन अणूशास्त्रज्ञ ठार झाले आहेत. इराणच्या तस्निम न्यूज एजन्सीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात साह शास्त्रज्ञ मरण पावले होते.

16:03 (IST) 14 Jun 2025

Israel vs Iran War : कोणता देश अधिक शक्तीशाली? अत्याधुनिक शस्त्रास्रांच्या बाबतीत कोण वरचढ?

Israel vs Iran Army comparison : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या लष्करातील पाच मोठे अधिकारी व सहा अणूशास्त्रज्ञ मृत्यूमुखी पडले आहेत. ...वाचा सविस्तर
15:42 (IST) 14 Jun 2025

तेहरान जळून खाक होईल; इस्रायलचा इराणला इशारा

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी शनिवारी इराणला इशारा दिला आहे की त्यांनी क्षेपणास्त्र हल्ले चालू ठेवले तर तेहरान जळून खाक होईल. इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या हानीनंतर काट्झ यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

15:41 (IST) 14 Jun 2025

“इस्रायलचा नाश होईल”, इराणच्या अयातुल्ला खामेनींचा इस्रायलला इशारा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी म्हणाले, इराणचे सैन्य प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे, इस्रायलने आधी हल्ला केला आणि सर्व संपले असे समजू नका. उलट ही संघर्षाची सुरुवात आहे. झियोनिस्ट राजवटीने सर्वात मोठी चूक केली असून ती अतिशय गंभीर आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे आता इस्रायली राजवटीचा विनाश जवळ आला आहे.

14:40 (IST) 14 Jun 2025

Iran-Israel war: "आमच्यामध्ये हस्तक्षेप कराल तर तुमच्या...", इराणचा अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सला इशारा

इराणने अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सला इशारा दिला आहे की त्यांनी जर इस्रायलवरील इराणी हल्ले थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या प्रदेशातील (मध्य-पूर्व आशिया) त्यांचे लष्करी तळ व नौदलाच्या मालमत्तांना लक्ष्य करू.

14:32 (IST) 14 Jun 2025

Iran-Israel war : आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी भारत सरकारकडून फोन नंबर जारी

इस्रायलमध्ये शेकडो भारतीय वास्यव्यास आहेत. त्यांना आपत्कालीन स्थिती मदत म्हणून केंद्र सरकारने दोन संपर्क क्रमांक (फोन नंबर) जाहीर केले आहेत. मदतीसाठी भारतीय नागरिक +98 9128109115, +98 9128109109 या दोन नंबरवर संपर्क करू शकतात.

14:13 (IST) 14 Jun 2025

Iran-Israel war : मध्य पूर्वेतील हवाई मार्ग बंद असल्याने एअर इंडियाची विमाने वळवली

एअर इंडियाने जाहीर केले आहे की इराण आणि मध्य पूर्वेतील बदललेल्या परिस्थितीमुळे, त्यांची अनेक विमाने पर्यायी हवाई मार्गाने चालवली जात आहेत. या प्रदेशातील प्रमुख हवाई मार्ग बंद झाल्यानंतर हे ऑपरेशनल बदल झाले आहेत.

13:30 (IST) 14 Jun 2025

इस्रायलच्या हल्ल्यात पाच इराणी अधिकारी व सहा अणू शास्त्रज्ञांचा मृत्यू, देशभरात ७८ बळी

इस्रायलने शुक्रवारी इराणवर केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये इराणच्या लष्करातील तीन मोठे अधिकारी शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. तर, इस्रायलने आज इराणच्या आणखी दोन अधिकाऱ्यांना मारल्याचं वृत्त इंडिया टूडेने प्रसिद्ध केलं आहे. इस्रायली हल्ल्यात काल बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रामचे प्रमुख आमिर अली हाजीजादेह यांचा मृत्यू झाला आहे. एलिट रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे कमांडर इन-चीफ जनरल हुसेन सलामी आणि तेहरानजवळच्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाला आहे. आज (१४ जून) इराणच्या अणू संशोधन केंद्राजवळ झालेल्या स्फोटात आणखी दोन लष्करी अधिकारी मृत्यूमुखी पडले आहेत.

13:25 (IST) 14 Jun 2025

इराण विरुद्ध इस्रायल : कोणाचं सैन्य अधिक शक्तिशाली? कोण ठरणार वरचढ?

Iran vs Israel इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध पेटले असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (१ ऑक्टोबर) रात्री इराणने इस्रायलच्या दिशेने शेकडो क्षेपणास्त्रे डागली. ...सविस्तर वाचा
13:22 (IST) 14 Jun 2025

Iran-Israel war : हा संघर्ष अमेरिकेच्या लष्करी तळांपर्यंत जाणार; इराणचा इशारा

इस्रायलची युद्ध चालू असताना इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे की उभय देशांमधील हा संघर्ष अमेरिकेच्या मध्य-पूर्वेतील लष्करी तळांपर्यंत जाईल.

13:19 (IST) 14 Jun 2025

इस्रायलने सात महिन्यांपूर्वीच आखलेली योजना

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू म्हणाले, "आम्ही ऑपरेशन रायझिंग लायनवर गेल्या सात महिन्यांपासून काम करत आहोत. आम्ही गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच ही योजना आखली होती".

13:06 (IST) 14 Jun 2025

इराणला मोठी किंमत मोजावी लागेल : इस्रायलचे संरक्षण मंत्री

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यांच्या कुरापती थांबल्या नाहीत तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असं काट्झ यांनी म्हटलं आहे.

13:00 (IST) 14 Jun 2025

"सेफ्टी शेल्टरच्या जवळच राहा", मोदी सरकारकडून इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

इस्रायल-इराण युद्धादरम्या भारत सरकारने इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. भारताने आपल्या नागरिकांना सांगितलं आहे की त्यांनी संरक्षण शिष्टाचाराचं (प्रोटोकॉल)पालन करावं. तसेच भारतीय नागरिकांनी सेफ्टी शेल्टरच्या जवळच राहावं. सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

12:13 (IST) 14 Jun 2025

संयुक्त राष्ट्राचं दोन्ही देशांना आवाहन

संयुक्त राष्ट्राने या संघर्षाची दखल घेतली असून दोन्ही देशांना हल्ले थांबवण्यास सांगितलं आहे. यूएनने म्हटलं आहे की "मध्य-पूर्वेतील तणाव आता बस्स झाला. दोन्ही देशांनी हल्ले थांबवावे".

12:10 (IST) 14 Jun 2025

इस्रायल-इराण संघर्षात आतापर्यंत ८१ बळी

इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. तर, इस्रायलने इराणमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ७८ जणांचा मृत्यू झाला असून ३२० जण जखमी झाले असल्याचं इराणने यूएनमध्ये सांगितलं आहे. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गेल्या ३६ तासांपासून चालू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये ८१ जणांचा मृत्यू झाला असून ३५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

12:06 (IST) 14 Jun 2025

Israel Iran Conflict: "... तर इस्रायलचा नाश होईल", इराणच्या अयातुल्ला खामेनींचा इस्रायलला इशारा; जगावर पुन्हा युद्धाचे ढग?

Ayatollah Ali Khamenei warns Israel: इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणकडूनही इस्रायलच्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. ...अधिक वाचा
12:06 (IST) 14 Jun 2025

Israel Iran Conflict : इराणचं इस्रायलला प्रत्युत्तर! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे; आयर्न डोम फेल?

Iran Missile Attack on Israel : इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचं वृत्त समोर आलं आहे. ...वाचा सविस्तर
12:05 (IST) 14 Jun 2025

Israel Iran Conflict : ज्याने धमकावलं, क्षेपणास्त्र डागली; इस्रायलने त्याचाच काटा काढला! हवाई हल्ल्यात मोठ्या इराणी लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू

Israel Air Strike on Iran : इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रामचे प्रमुख आमिर अली हाजीजादेह यांचा मृत्यू झाला आहे. ...सविस्तर बातमी
12:05 (IST) 14 Jun 2025

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांसह सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू, आण्विक तळही उद्ध्वस्त; कशी केली कारवाई?

Israel Iran Tension : इराणी माध्यमे व प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की नातान्झ प्रांतातील इराणच्या प्राथमिक युरेनियम शुद्धीकरण प्रकल्पात मोठा स्फोट झाला आहे. ...सविस्तर बातमी
12:05 (IST) 14 Jun 2025

Israel-Iran Conflict : इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, नेमकी काय झाली चर्चा?

इस्त्रायलने इराणावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. ...सविस्तर वाचा