Israel Iran Conflict News Updates: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आज पाच दिवस पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजूंनी होत असलेल्या हल्ल्यांमुळे वातावरण आणखी चिघळले आहे. इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान २२४ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तेहरानचे काही उच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञ आणि नागरिकांचा समावेश आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या हद्दीत इराणी हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने मंगळवारी पहाटे इशारा दिला की, त्यांना इराणकडून सोडण्यात आलेले नवीन क्षेपणास्त्र आढळले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी तेहरानमधील अमेरिकन रहिवाशांना तेथून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. याचबरोबर, इराण हे युद्ध जिंकणार नसून त्यांनी यासाठी चर्चा करावी, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. यासह इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या घडामोडींचा लाईव्ह आढावा घेऊया.
Israel Iran Conflict Live Updates, 17 June 2025: इस्रायल-इराण संघर्ष लाईव्ह अपडेट्स.
इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष वाढला; दोन्ही देशांकडून हवाई हल्ले सुरुच
इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी वाढला आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट केलं आहे. दुसरीकडे इराणनेही इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायलने इराणचे तेल डेपो लक्ष्य करत मोठे हवाई हल्ले केल्यामुळे संघर्ष वाढला. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा देखील खात्मा झाला. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे. आता इराणच्या सरकारी माध्यमांनी तेहरानच्या पश्चिमेला सतत आणि तीव्र स्फोटांचे वृत्त दिले आहे. इराणी राज्य माध्यम आयआरएनएच्या म्हणण्यानुसार, तेहरानच्या पश्चिमेला अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
Donald Trump : इराण-इस्रायल संघर्ष विकोपाला? ट्रम्प यांचा इराणच्या सर्वोच्च नेत्याला इशारा; म्हणाले, 'खामेनी कुठे लपलेत हे माहिती, पण…'
Donald Trump : इस्त्रायल-इराणच्या संघर्षात अमेरिका सहभागी? डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, "आता इराणच्या आकाशावर…"
इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला
इस्त्रायल आणि इराणमध्ये जवळपास एका आठवड्यापासून जरोदार संघर्ष सुरू आहे. इस्त्रायलकडून सातत्याने इराणच्या तेहरान या शहरात विविध भागांवर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. आता इराणी सैन्याने तेल अवीवमधील इस्रायली लष्करी गुप्तचर केंद्रावर हल्ला केल्याचे म्हटले आहे. झिओनिस्ट राजवटीच्या गुप्तचर केंद्रावर त्याच्या गाभ्यामध्ये मार्गदर्शित क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला," असे इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेझा तलाई-निक म्हणाले.
इस्त्रायल आणि इराणमधील तणावावर चीनची प्रतिक्रया, शी जिनपिंग म्हणाले की, "आम्हाला चिंता..."
इस्त्रायल आणि इराणमध्ये जवळपास एका आठवड्यापासून जरोदार संघर्ष सुरू आहे. इस्त्रायलकडून सातत्याने इराणच्या तेहरान या शहरात विविध भागांवर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. या संदर्भात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी म्हटलं की, "इराण-इस्रायल संघर्षावरून मध्य पूर्वेतील तणावात अचानक वाढ झाल्यामुळे चीन खूप चिंतेत आहे. शी जिनपिंग यांनी इतर देशांच्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षिततेचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कृत्यांना चीनचा विरोध पुन्हा एकदा स्पष्ट केला. लष्करी संघर्ष हा उपाय नाही आणि प्रादेशिक तणाव वाढवणं आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सामान्य हिताचे नाही", असं ते म्हणाले असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Israel Iran Conflict : तेहरान सोडण्यासाठी लोकांची धावपळ; इस्रायल-इराणच्या संघर्षाचा काय परिणाम होतोय? जाणून घ्या १० महत्वाच्या घडामोडी
"सद्दाम हुसेन यांच्यासारखी अवस्था करू", इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा अयातुल्ला खामेनींना इशारा
इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी इशारा दिला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची अवस्था इराकच्या सद्दाम हुसेन यांच्यासारखी करू. "इस्रायलविरुद्ध मार्ग स्वीकारणाऱ्या इराकमधील हुकूमशहाचे काय झाले, ते लक्षात ठेवा", असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Israel Iran Conflict : इस्रायलने इराणच्या लष्करी नेतृत्वाला पळून जाण्यास भाग पाडले, इस्रायली लष्करी अधिकाऱ्याचा दावा
मंगळवारी एका वरिष्ठ इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायलने इराणच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांशी संबंधित डझनभर ठिकाणांवर हल्ले करत "इराणच्या लष्करी नेतृत्वाला पळून जाण्यास भाग पाडले".
नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सशी बोलताना, अधिकाऱ्याने दुजारा दिला की, इस्रायलने अद्याप इराणच्या भूमिगत फोर्डो अणुसुविधेला लक्ष्य केले नसले तरी, ते शक्य आहे. त्यांनी सांगितले की अणु आपत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
Israel Iran Conflict : लेबनॉनच्या वॉकी-टॉकी हल्ल्यातून घेतला धडा; इराणने इंटरनेट कनेक्टेड डिव्हाईस वापरण्यास घातली बंदी, इस्रायलबरोबरील संघर्ष वाढणार?
रशिया आणि चीनचा शांतता चर्चेत मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव
इराण-इस्रायल यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी जागतिक नेते आवाहन करत आहेत. अमेरिकेने शस्त्रविरामासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिल्याचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा दावा ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. तर, दुसरीकडे रशिया आणि चीनने शांतता चर्चेत मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Israel Iran Conflict Live News Updates: इराणच्या हल्ल्यांमुळे हैफामध्ये नुकसान
टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे मध्य इस्रायल आणि हैफामध्ये खूप नुकसान झाले आहे. यामुळे २००० लोकांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले.
Israel Iran Conflict Live News Updates: इराणमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुट्ट्या रद्द
मंगळवारी इस्रायली हल्ले सुरूच राहिल्याने, अधिकाऱ्यांनी डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तेहरानमध्ये इस्रायलला "कठोर" प्रत्युत्तर देण्याचे आवाहन करणारे फलक घेऊन लोक रस्त्यावर उतरले आहेत.
Israel Iran Conflict Live News Updates: सायबर हल्ल्यामुळे इराणच्या सरकारी बँकेची सेवा विस्कळीत
फार्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सेपाह बँकेवर सायबर हल्ला झाला असून, त्यामुळे बँकेच्या ऑनलाइन सेवा विस्कळीत झाल्या आहे. बँकेला काही तासांत ही समस्या सोडवण्याची अपेक्षा आहे. इस्रायलशी संबंधित असलेल्या प्रीडेटरी स्पॅरो या हॅकिंग गटाने याची जबाबदारी स्वीकारली असून बँकेचा डेटा “नष्ट” केल्याचा दावा केला आहे.
Israel-Iran Conflict LIVE News Updates: ‘लवकरात लवकर इराण सोडा’, चीनचे नागरिकांना आवाहन; इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता!
इस्रायलने इराणविरुद्ध हल्ले सुरू केल्यापासून इराणमधून ६०० हून अधिक परदेशी नागरिक शेजारच्या अझरबैजानमध्ये दाखल झाले आहेत, असे बाकूमधील एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. "इस्रायल आणि इराणमधील लष्करी तणाव वाढल्यापासून, १७ देशांमधील ६०० हून अधिक नागरिकांना अझरबैजानमार्गे इराणमधून बाहेर काढण्यात आले आहे," असे एएफपीने सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले.
याचबरोबर चीनने त्यांच्या नागरिकांना लवकरात लवकर इराण सोडण्याचे आवाहन केले आहे.
Israel Iran Conflict : इराण अण्वस्रनिर्मितीपासून काही महिने नाही, तब्बल ३ वर्षे दूर! अमेरिकी गुप्तचर खात्याची माहिती
शस्त्रविरामासाठी इराणशी संपर्क साधल्याचा दावा ट्रम्प यांनी फेटाळला; म्हणाले, "जर त्यांना चर्चा करायची असेल तर..."
ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, त्यांनी "कोणत्याही प्रकारे किंवा स्वरूपात" शस्त्रविरामाच्या चर्चेसाठी इराणशी संपर्क साधला नाही.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, इराणने अणुकार्यक्रमावरील अलीकडील चर्चेदरम्यान सादर केलेल्या करारावर स्वाक्षरी करायला हवी होती.
"ही अत्यंत खोटी बातमी आहे! जर त्यांना बोलायचे असेल तर त्यांना माझ्याशी कसा संपर्क साधायचा हे माहित आहे. त्यांनी टेबलावर असलेला करार स्वीकारायला हवा होता. त्यामुळे बरेच जीव वाचले असते!!!," असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे.
Israel-Iran Conflict LIVE News Updates: इस्रायलकडून निवासी इमारती, रुग्णालये आणि संशोधन केंद्रे लक्ष्य; इराणचा आरोप
इस्रायलने इराणवरील लष्करी हल्ल्यात निवासी इमारती, रुग्णालये, संशोधन केंद्रे आणि नागरी सार्वजनिक पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचे, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासाने मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प इराण-इस्रायल संघर्ष आणखी पेटवत आहेत; चीनचा आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानमधील नागरिकांना तात्काळ शहर सोडण्याचा इशारा दिल्यानंतर, चीनने मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमधील संघर्ष भडकवल्याचा आरोप केला आहे.
"आग भडकवणे, तेल ओतणे, धमक्या देणे आणि दबाव वाढवणे यामुळे परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होणार नाही, तर संघर्ष आणखी तीव्र होईल आणि वाढेल," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटले आहे.
इजिप्त आणि जॉर्डनसह २० देशांचे इस्रायल-इराण संघर्ष थांबवण्याचे आवाहन
इजिप्त आणि जॉर्डनसह इतर अनेक देशांनी इस्रायल-इराण संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. २० देशांनी संयुक्त निवेदनात इस्रायलच्या इराणविरुद्धच्या आक्रमकतेमुळे मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा निषेध केला आणि या प्रदेशात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी राजनैतिक चर्चेचे आवाहन केले आहे, असे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे.
Israel-Iran Conflict LIVE News Updates: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा मृत्यू; इस्रायली सैन्याचा दावा
गेल्या पाच दिवसांपासून इस्रायल आणि इराण या देशांमध्ये लष्करी संघर्ष सुरू आहे. अशात आता इस्रायलच्या सैन्याने दावा केला आहे की, इराणचे युद्धकाळातील प्रमुख आणि सर्वात वरिष्ठ लष्करी कमांडर म्हणून ओळखले जाणारे अली शादमानी यांना ठार मारले आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
Israel-Iran Conflict: तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना शहराबाहेर हलवले; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव दूतावासाने केलेल्या व्यवस्थेद्वारे शहराबाहेर हलवण्यात आले आहे. यासह इतर भारतीय नागरिकांनाही परिस्थिती लक्षात घेता शहराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्वतंत्रपणे, काही भारतीयांना आर्मेनियाच्या सीमेवरून इराण सोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पातील सुमारे १५,००० सेंट्रीफ्यूज नष्ट
इराणचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प, नातांझवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात नातांझमध्ये असलेले सुमारे १५,००० सेंट्रीफ्यूज नष्ट झाले आहेत.
Israel-Iran Conflict: “तेहरानमधून बाहेर पडा”, इराण-इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे भारतीय नागरिकांना आवाहन
इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवाई हल्ले होत असल्याने, भारत सरकारने मंगळवारी एक नवीन सूचना जाहीर करून तेहरानमध्ये राहणाऱ्या भारतीय आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना (पीआयओ) तेहरानमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेला परतण्याचा आणि इस्रायल-इराण युद्धविरामाचा संबंध नाही: डोनाल्ड ट्रम्प
"प्रसिद्धी मिळवण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चुकून असे म्हटले की, मी कॅनडामधील जी-७ शिखर परिषदेतून निघून इस्रायल आणि इराणमधील "युद्धविराम" वर काम करण्यासाठी अमेरिकेला परतलो आहे. हे चुकीचे आहे! मी आता वॉशिंग्टनला का जात आहे हे त्यांना माहित नाही, परंतु त्याचा युद्धविरामाशी निश्चितच काहीही संबंध नाही. त्याहूनही मोठे. मुद्दाम असो वा नसो, इमॅन्युएल नेहमीच चूक करतात," असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Israel-Iran Conflict: "अमेरिकन नागरिकांना मदत करण्याच्या स्थितीत नाही", जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाची माहिती
जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, ते इस्रायल सोडत असलेल्या अमेरिकन लोकांना थेट मदत करण्याच्या स्थितीत नाहीत. सोमवारी बंद असलेला दूतावास मंगळवारीही बंद राहणार आहे. जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाने पुढे म्हटले आहे की, सर्व अमेरिकन सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या निवासस्थानाजवळ आणि सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये राहावे.
Israel-Iran: इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन सुरू; जाणून घ्या, कुठे साधायचा संपर्क
Israel-Iran Conflict: जी-७ देशांचा इस्रायलला पाठिंबा
इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, सात देशांच्या जी-७ गटाने इस्रायलला पाठिंबा दर्शविला असून, इराण मध्य पूर्वेतील अस्थिरतेचे कारण असल्याचे म्हटले.
इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीमुळे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी घोषणा केली की त्यांनी त्यांच्या आवारात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत.
नियंत्रण कक्षाचे संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१८००११८७९७ (टोल फ्री)
+९१-११-२३०१२११३
+९१-११-२३०१४१०४
+९१-११-२३०१७९०५
+९१-९९६८२९१९८८ (व्हॉट्सअॅप)
situationroom@mea.gov.in
https://twitter.com/MEAIndia/status/1934785653788549630
याव्यतिरिक्त, इराणमधील तेहरान येथील भारतीय दूतावासाने २४×७ आपत्कालीन हेल्पलाइन सुरू केली आहे ज्याचा संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहे:
फक्त कॉलसाठी: +९८ ९१२८१०९११५, +९८ ९१२८१०९१०९
व्हॉट्सअॅपसाठी: +९८ ९०१०४४५५७, +९८ ९०१५९९३३२०, +९१ ८०८६८७१७०९
बंदर अब्बास: +९८ ९१७७६९९०३६
झाहेदान: +९८ ९३९६३५६६४९
cons.tehran@mea.gov.in
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांना "तात्काळ तेहरान सोडण्याचे" आवाहन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेबद्दल गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
https://twitter.com/TruthTrumpPosts/status/1934745786832552115
ते म्हणाले की, "मी सांगितलेल्या करारावर इराणने स्वाक्षरी करायला हवी होती. हे किती लाजिरवाणे आणि मानवी जीवनाचा अपव्यय. सोप्या भाषेत सांगायचे तर, इराणला अण्वस्त्र मिळू शकणार नाहीत. मी ते वारंवार सांगत आलो आहे. प्रत्येकाने ताबडतोब तेहरान सोडावे!"
Israel-Iran Conflict: 'इराण जिंकू शकणार नाही', इस्रायल-इराण संघर्षावरील जी-७ मसुद्यावर स्वाक्षरी करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार
इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान २२४ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तेहरानचे काही उच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञ आणि नागरिकांचा समावेश आहे. (Photo: Reuters)