Iran attacks Burj Al Arab, Dubai airport: अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात इराणविरोधात युद्ध सुरू असून त्यात महाराष्ट्रातील काही प्रवासी अडकले आहेत. त्यामध्ये सात वर्षांची एक मुलगीही आहे. या कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा मुद्दा उपस्थित केला असून महाराष्ट्रातील या कुटुंबियांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आखाती देशांत असलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन जाहीर केली आहे.
बाहेर जाण्यास मनाई
सुरुवातीला आम्ही राहत असलेल्या परिसरात काही ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते, तेथून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. बाहेर जाण्यास किंवा फिरायला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. पर्यटकांना बाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमचे उद्या भारतात येण्यासाठी विमान होते; मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे चिंता वाढली आहे, अशी प्रतिक्रिया कलंत्री कुटुंबीयांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.
नाशिक जिल्ह्यातील कुटुंब
हे कुटुंब पर्यटनासाठी संयुक्त अरब अमिरात येथे गेले होते. सध्या ते दुबई शहरातील सुरक्षित ठिकाणी आहेत. त्यांना कुठेही बाहेर जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे कुटुंब नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आहे. अभिषेक कलंत्री, नम्रता कलंत्री आणि मिराया कलंत्री अशी दुबईत अडकलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांनी मदतीसाठी सरकारकडे विनंती केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून परराष्ट्र मंत्रालयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
भारतीय नागरिकांसाठी ‘ॲडव्हायझरी’
दरम्यान, मध्यपूर्व आणि परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी केली आहे.
पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे आवाहन
आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन आणि संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.
आपत्कालीन संपर्क तपशील
रामल्लाह (पॅलेस्टाईन)
फोन : +970592916418
ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
दोहा (कतार)
फोन : 00974-55647502
ईमेल : cons.doha@mea.gov.in
रियाध (सौदी अरेबिया)
फोन : 00-966-11-4884697
WhatsApp : 00-966-542126748
टोल फ्री : 800 247 1234
ईमेल : cw.riyadh@mea.gov.in
तेल अवीव (इस्रायल)
फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in
तेहरान (इराण)
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री : 800-46342
WhatsApp : +971543090571
ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in
कुवैत
फोन : +96565501946
ईमेल : community.kuwait@mea.gov.in
बाहरीन
फोन : 00973-39418071
मस्कत
टोल फ्री : 80071234
WhatsApp : +96898282270
ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in
जॉर्डन
फोन : 00962-770 422 276
बगदाद (इराक)
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899
वेबसाइट :https://www.eoibaghdad.gov.in
ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in
