Israel Iran War Live : अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणची राजधानी तेहरानवर अनेक भीषण हल्ले केले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रतिहल्ले केले असून युद्धाचा भडका उडाला आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिका आणि इस्रायलने केला आहे. इराणच्या वृत्तवाहिन्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, इस्रायल आणि इराणमधील या संघर्षाच्या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Israel Iran War Live Updates : इस्रायल आणि इराणमधील या संघर्षाच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान पंतप्रधान मोदींचा नेतान्याहूंना फोन; नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत झाली चर्चा
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी संवाद साधला.... वाचा सविस्तर
खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेचा इराणी नौदलावर जबरदस्त प्रहार; ९ युद्धनौका बुडवल्याचा ट्रम्प यांचा दावा
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इस्त्रायल आणि अमेरिका अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तेहराणमधील महत्त्वाची कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांवर इस्त्रायल व अमेरिकेने लक्ष्य केले आहे. तसेच अमेरिकेने इराणच्या नौदलावरही निशाणा साधल्याचा दावा केला आहे. या कारवाईत सुमारे ९ जहाजे बुडाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. उर्वरित जहाजांचाही शोध सुरू असून तीही नष्ट करण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे
"येत्या काळात इराणवरील हल्ले वाढतील", नेतन्याहू यांचा इशारा
तेहरानचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर येत्या काळात इराणविरुद्ध हल्ले वाढण्याची शक्यता आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी रविवारी म्हटले. एका निवेदनात नेतान्याहू म्हणाले, "आमचे सैन्य सध्या तेहरानवर तीव्रतेने हल्ला करत आहे, जे येत्या काळात वाढतच जाईल. असं असलं तरी, हे वेदनादायक दिवस आहेत. काल येथे तेल अवीवमध्ये आणि आता बेट शेमेशमध्ये, आम्ही प्रिय लोक गमावले."
इराणने अमेरिकवर ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली; विमानवाहू जहाज अब्राहम लिंकन लक्ष्य!
इराणने अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकनवर ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, असे तेहरानच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) ने म्हटले आहे, असे इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे.
इराणने दुबई आणि अबू धाबी, दोहा या ठिकाणी हवाई हल्ले
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर भीषण हल्ले केले असून अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरलं आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आणखी आक्रमक होत इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हवाई तळांवर प्रतिहल्ले केले आहेत. यामध्ये इराणने दुबई आणि अबू धाबी, दोहा या ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत.
UAE On iran : “जरा शुद्धीवर या, तुमचं युद्ध शेजारी राष्ट्रांशी नाही”, यूएईचा इराणला मोठा इशारा; दुबई अन् अबू धाबीवरील हल्ल्यांमुळे UAE चा संताप
United Arab Emirates On iran : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर भीषण हल्ले केले असून अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरलं आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आणखी आक्रमक होत इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हवाई तळांवर प्रतिहल्ले केले आहेत. यामध्ये इराणने दुबई आणि अबू धाबीमधील अमेरिकेच्या काही हवाई तळांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे यूएईने इराणवर संताप व्यक्त केला आहे.
Indian Crew Oil Tanker Attacked Strait of Hormuz : भारतीय कर्मचारी असलेल्या तेल टँकरवर इराणचा भीषण हल्ला; होर्मुझच्या समुद्रात नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल टँकरवर इराणने हल्ला केला आहे. यात १५ भारतीय क्रू होते असंही समोर आलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
भारतीय कर्मचारी असलेल्या तेल टँकरवर इराणचा भीषण हल्ला; होर्मुझच्या समुद्रात नेमकं काय घडलं?
Indian Crew Oil Tanker Attacked in Strait of Hormuz update : अमेरिका आणि इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल टँकरवर इराणने हल्ला केला आहे. यात १५ भारतीय क्रू होते असंही समोर आलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ओमानच्या दुक्म बंदरावर ड्रोन हल्ल्यानंतर झालेल्या हल्ल्यात पलाऊ ध्वज असलेल्या तेल टँकरवर ओमानच्या मुसंदम द्वीपकल्पात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले आहेत, असे ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने (MSC) सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी एक धोरणात्मक मार्ग आहे, ज्याला जगातील सर्वात संवेदनशील सागरी अडथळा म्हणून वर्णन केले जाते. काल इराणच्या नौदलाने दिलेल्या रेडिओ इशाऱ्यात असा दावा करण्यात आला होता की कोणत्याही जहाजाला अरुंद कॉरिडॉरमधून जाण्याची परवानगी नाही, त्यामुळे हा मार्ग धोक्यात आला.
Masoud Pezeshkian : “खामेनींच्या हत्येचा बदला घेणं हा आमचा कायदेशीर अधिकार”, इराणच्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य
Masoud Pezeshkian : अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आणखी आक्रमक होत इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हवाई तळांवर प्रतिहल्ले केले आहेत. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच इराणने अयातुल्ला अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा इशारा आता इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दिला आहे. ‘खामेनींच्या हत्येचा बदला घेणं हा आमचा कायदेशीर अधिकार आहे’, असं वक्तव्य मसूद पेझेश्कियान यांनी केलं आहे. त्यामुळे आता अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्ध आणखी भडकण्याची चिन्हं आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
Iran New Supreme Leader Ayatollah Arafi : खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्ला अराफी!
Iran New Supreme Leader Ayatollah Arafi update : अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच, अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी अयातुल्ला अलीरेजा अराफी यांना तात्पुरते इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Israel Iran War Ayatollah Khamenei 2014 Post : "इस्रायल विनाशाजवळ", खामेनींची १० वर्ष जुनी पोस्ट शेअर करत इस्रायलने इराणला सुनावले!
Iran New Supreme Leader Ayatollah Arafi : खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्ला अराफी!
इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू; आता अयातुल्ला अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती
अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण आणखी आक्रमक प्रतिहल्ले करत आहे. त्यामुळे आता अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. आता इराणने अयातुल्ला अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे.
इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; देशभर सायरन, लाखो नागरिक आश्रयस्थानांकडे धावले
Iran launched a missile attack on Israel: इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्रायल हाय अलर्टवर आहे. तेल अवीव आणि देशातील इतर भागांत सायरन वाजत आहेत. टीपीएसच्या वृत्तानुसार, रविवारी इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच नागरिकांच्या मोबाईल फोनवर क्षेपणास्त्र, रॉकेट किंवा ड्रोन हल्ल्याची आगाऊ सूचना पाठवण्यात आली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दुबई, अबुधाबीमध्ये अडकले; युद्धादरम्यान घरी परतण्यासाठी आवाहन
इराण आणि अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबई, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथे शिक्षण घेण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अडकले आहेत. शनिवारपासून दुबई आणि अबुधाबीमधील भारतीय विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्रे पडण्याच्या आणि स्फोटांच्या आवाजामुळे अडचणी येत आहेत. तेथील विद्यार्थी सुरक्षित भारतात घरी परतण्यासाठी भारत सरकारकडे विनवणी करत आहेत.
Iran–Israel war: युद्धाच्या छायेत दुबईत अडकले मराठी कुटुंब; ७ वर्षांच्या चिमुकलीसह सुटकेची आर्त हाक
Iran attacks Burj Al Arab, Dubai airport: अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात इराणविरोधात युद्ध सुरू असून त्यात महाराष्ट्रातील काही प्रवासी अडकले आहेत. त्यामध्ये सात वर्षांची एक मुलगीही आहे. या कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा मुद्दा उपस्थित केला असून महाराष्ट्रातील या कुटुंबियांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आखाती देशांत असलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन जाहीर केली आहे.
Israel Iran War Ayatollah Khamenei 2014 Post : “इस्रायल विनाशाजवळ”, खामेनींची १० वर्ष जुनी पोस्ट शेअर करत इस्रायलने इराणला सुनावले!
Israel Iran War Khamenei 2014 Post Viral Update : इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा याबाबत अमेरिका आणि इस्रायलकडून दबाव आहे, यासंदर्भात वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिका आणि इस्रालयने इराणवर जोरदार हल्ले केले. दरम्यान, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृ्त्त आहे. दरम्यान, खामेनी यांनी २०१४ साली इस्रायलबाबत एक पोस्ट केली होती. तीच पोस्ट आता इस्रायलच्या लष्कराने शेअर केली आहे.
Karachi : खामेनी यांच्या मृत्यूचे पाकिस्तानात पडसाद; अमेरिकन दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यू
खामेनी यांच्या मृत्यूचे पाकिस्तानात पडसाद; अमेरिकन दूतावासाची तोडफोड
अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे इराण आणखी आक्रमक प्रतिहल्ले करत आहे. मात्र, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद आता पाकिस्तानात उमटले आहेत.
S Jaishankar : मंत्री एस जयशंकर यांची इराण आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा; दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचं आवाहन
इराणच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा अतिशय शक्तिशाली हल्ला करण्याची धमकी इराणला दिली आहे. ...अधिक वाचा
इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू; युद्ध आणखी भडकण्याची शक्यता
अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणची राजधानी तेहरानवर अनेक भीषण हल्ले केले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रतिहल्ले केले असून युद्धाचा भडका उडाला आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिका आणि इस्रायलने केला आहे. इराणच्या वृत्तवाहिन्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.
Iran strike Dubai airport: इराणी क्षेपणास्त्रांचा दुबईवर प्रहार; विमानतळ आणि बुर्ज अल अरबचे नुकसान, आखाती हवाई सेवा विस्कळीत
Iran strike Dubai airport: अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका व इस्त्रायलच्या कारवाईनंतर इराणने आखाती देशांतील अमेरिकेचे मित्रदेश तसेच तेथील अमेरिकन लष्करी तळांवर लक्ष्य साधल्याची माहिती आहे. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री झालेल्या इराणी हल्ल्यांत दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि त्याच्या शेजारील ऐतिहासिक बुर्ज अल अरब हॉटेलचे नुकसान झाले आहे. तसेच बुर्ज खलिफा हॉटेलच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. रविवारी पहाटे अमिरातीच्या मीडिया ऑफिसने माहिती दिली की विमानतळावरील घटनेत चार जण जखमी झाले आहेत.
Ayatollah Seyyed Ali Khamenei Death : खामेनींच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया, “इतिहासातला क्रूर माणूस ठार…”
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. खामेनी यांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली आहे. जवळपास तीन दशकांपासून खामेनी हे इराणवर एकहाती वर्चस्व गाजवत होते. ज्यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासतला सर्वात क्रूर माणूस ठार झाल्याची प्रतिक्रिया दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी खामेनी यांचा उल्लेख जगातला सर्वात क्रूर माणूस असा केला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा युद्धात मृत्यू, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू काय म्हणाले?
Ayatollah Seyyed Ali Khamenei जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयांजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसंच त्यांच्या घराजवळ बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आलं. त्यामुळे खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी केला.
सविस्तर वाचा
“आम्ही जिथे लपलो होतो, तिथेच स्फोट…”, दुबईत अडकलेल्या पी. व्ही. सिंधूचा थरारक अनुभव
इराणने दुबईतील काही ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. दुबईसह मध्य आशियातील अनेक प्रमुख विमानतळे बंद करण्यात आली आहेत. याचा फटका भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना बसला आहे
इराणी क्षेपणास्त्रांचा दुबईवर प्रहार; विमानतळ आणि बुर्ज अल अरबचे नुकसान, आखाती हवाई सेवा विस्कळीत
अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका व इस्त्रायलच्या कारवाईनंतर इराणने आखाती देशांतील अमेरिकेचे मित्रदेश तसेच तेथील अमेरिकन लष्करी तळांवर लक्ष्य साधल्याची माहिती आहे. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री झालेल्या इराणी हल्ल्यांत दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि त्याच्या शेजारील ऐतिहासिक बुर्ज अल अरब हॉटेलचे नुकसान झाले आहे. तसेच बुर्ज खलिफा हॉटेलच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. रविवारी पहाटे अमिरातीच्या मीडिया ऑफिसने माहिती दिली की विमानतळावरील घटनेत चार जण जखमी झाले आहेत.
इराण, अमेरिका, इस्रायल युद्धात खामेनी यांचा मृत्यू, मृतदेह सापडल्याचा दावा
जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयांजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसंच त्यांच्या घराजवळ बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आलं. त्यामुळे खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी केला.
Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत भारताने व्यक्त केली चिंता; “आम्ही सर्व….”
India On Israel Iran War : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे आज इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराण हादरलं आहे. इराणच्या अनेक शहरात मोठे स्फोट झाल्यामुळे इराणच्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. तर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत प्रतिहल्ले केले आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे.
Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध भडकलं; तर इराणचाही पलटवार, अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ले
Israel Iran War : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे आज इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराण हादरलं आहे. इराणच्या अनेक शहरात मोठे स्फोट झाल्यामुळे इराणच्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. तर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत प्रतिहल्ले केले आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे.

इस्रायल आणि इराणमधील या संघर्षाच्या सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ., (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
