वृत्तसंस्था, दुबई, वॉशिंग्टन, तेल अविव
इराणच्या ‘साउथ पार्स’ या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य केल्यानंतर संतापलेल्या इराणचे आखाती देशांतील ऊर्जा क्षेत्रांवरील हल्ले पाहून इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी एक पाऊल मागे घेतले. इराणच्या नैसर्गिक वायू क्षेत्राला लक्ष्य करणार नसल्याचे विधान त्यांनी केले.
इराणच्या या प्रतिहल्ल्यांमुळे तेलाच्या किमती भडकल्या आणि त्याचे जागतिक परिणाम दिसू लागले. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नाराजी व्यक्त केली. या हल्ल्याला आपण मंजुरी दिली नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. इस्रायल यापुढे असे हल्ले करणार नाही, अशी हमीही ट्रम्प यांनी दिली होती.
