इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये बुधवारी रात्रभर भीषण हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील बंडखोर गट हेझबोलचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागार अली युसूफ हर्शी याला ठार करण्यात आल्याचा दावा इस्रायलने गुरुवारी दिली आहे.

टेलिग्रामवर जारी करण्यात आलेल्या आपल्या निवेदनात इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, “आयडीएफने बैरुतमध्ये हेझबोलाचा सेक्रेटरी जनरल नईम कासिम याचा खाजगी सचिव आणि पुतण्या अली युसूफ हार्षी याला ठार केले आहे. रात्रीच्या वेळी हेझबोलाच्या दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.”

इस्रायली लष्कराने पुढे सांगितले की, हर्षी हा नईम कासिमचा अत्यंत जवळचा सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होता. हेझबोला प्रमुखाच्या कार्यालयाचे व्यवस्थापन पाहण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. आयडीएफने असेही नमूद केले की, त्यांनी लेबनॉनमधील लिटानी नदीच्या उत्तर ते दक्षिण भागात प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या क्रॉसिंगवरही हल्ले केले आहेत. या मार्गांचा वापर हजारो शस्त्रे, रॉकेट्स आणि लाँचर्स यांच्या वाहतुकीसाठी केला जात होता.

याबरोबरच इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, त्यांनी दक्षिण लेबनॉनमध्ये हेझबोला दहशतवाद्यांकडून वापरली जाणारी जवळपास १० शस्त्रास्त्र साठवणूक ठिकाणे, लाँचर्स आणि कमांड सेंटर्सना यांनाही लक्ष्य केले.

इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर एकमत झाले आहे, असे असतानाही इस्रायलने लेबनॉनमध्ये असंख्य ठिकाणी हवाई हल्ले केले. यावर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी युद्धविराम लेबनॉनसाठी लागू नसल्याचे दावा केला,

इस्रायलने बुधवारी लेबनॉनवर भीषण हल्ले केले. २८ फेब्रुवारी रोजी इराणबरोबर सुरू झालेल्या संघर्षांनंतरचा हा सर्वात मोठा हल्ला होता असे सांगितले जात आहे. या हल्ल्यांमध्ये बैरुतमधील हेझबोलाचे १०० हून अधिक कमांड सेंटर्स आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले.