Israel Need India’s cooperation to Start Metro Project in Tel Aviv : इस्रायलचे भारतातील नवनियुक्त राजदूत रुवेन अझर यांनी उभय देशांचे संबंध, इस्रायल – हमास युद्ध, या युद्धातील भारताची भूमिका, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील भारताची प्रगती, दोन्ही देशांमधील वेगवेगळ्या क्षेत्रांमधील भागीदारी अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. बांधकाम, निर्मिती व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती व देशभर चाललेल्या विकासकामांचा उल्लेख करत रुवेन अझर म्हणाले, आम्हालाही तेल अविवमध्ये १०० किलोमीटर लांबीची मेट्रो सेवा सुरू करायची आहे. त्यासाठी आम्ही जगभरातील कंपन्यांना, प्रामुख्याने भारतातील कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहोत.

दी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रुवेन अझर म्हणाले, “तेल अविवमध्ये मेट्रोच्या निर्मितीसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या कंपन्या कमी खर्चात उत्तम दर्जाची मेट्रो सेवा निर्माण करू शकतात अशा कंपन्यांकडे आमचं लक्ष आहे. भारताकडे ही क्षमता आहे. भारत अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचा भागीदार राहिला आहे. भारतात रस्ते, विमानतळं, बंदरांशिवाय हजारो किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पांवर काम केलं जात आहे. त्यामुळे आमचं भारतातील कंपन्यांकडे लक्ष आहे”.

mumbai local viral video Man risks life
मुंबईकरांनो जीव एवढा स्वस्त आहे का? लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी तरुणाची धडपड, रुळावर उतरला अन्…; पाहा धक्कादायक VIDEO
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant And Nikki Tamboli Viral video
Video: “आपली नावं मोठी आहेत, त्यामुळे आपला वापर झालाय”, अभिजीतबरोबर गप्पा मारताना निक्की तांबोळीचं विधान; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
bigg boss marathi updates total six contestant nominated
घरातील ६ सदस्य नॉमिनेट! ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशन; व्होटिंग लाइन्स केव्हा बंद होणार? जाणून घ्या…
Blocking toilet sleeping on floor YouTuber narrates Indian Railways-like experience in Chinese train
Video : “शौचालयाजवळ बसणे, सीट खाली झोपणे, खचाखच गर्दी”, अशी आहे चीनमधील ट्रेनची अवस्था! युट्युबरने भारतीय रेल्वेबरोबर केली तुलना
Western railway recruitment 2024
Western Railway मध्ये नोकरीची सर्वात मोठी संधी! पाच हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरू; कुठे अन् कसा भरणार अर्ज? जाणून घ्या
indian railway viral video
“सीट घरी घेऊन जाणार आहेस का?” ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवाशाची दादागिरी; म्हणतो कसा…; पाहा video
Adani Faces Challenges in Kenya| Kenya Workers Strike Against Adani Project
Adani Airport Project in Kenya: “अदाणी’ला जावंच लागेल”, केनियामध्ये शेकडो कामगार रस्त्यावर उतरले; आंदोलन संपूर्ण नैरोबीत पसरलं!

हे ही वाचा >> “आम्ही भारतात जिवंत परत येऊ असं वाटलं नव्हतं”; रशिया-युक्रेन युद्धात लढलेल्या कर्नाटकच्या तिघांनी सांगितली आपबीती!

इस्रायलला भारताकडून मदतीची अपेक्षा

गेल्या अनेक दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की इस्रायल त्यांच्या देशातील निर्मिती क्षेत्रातील कामासाठी भारताकडे मदत मागतोय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी कामगार व मजुरांवर निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तिथले अनेक प्रकल्प मजुरांअभावी खोळंबले आहेत. अशात त्यांना या आघाडीवरही भारताकडून मदतीची अपेक्षा आहे.

यावेळी रुवेन अझर यांनी इस्रायल-भारत संबंध, संरक्षण व सुरक्षा, कृषी व पाणी, इनोव्हेशन व स्टार्ट-अप्स, बांधकाम क्षेत्रासह वेगवेगळ्या क्षेत्रातील उभय देशांमधील भागीदाऱ्यांवर प्रकाश टाकला. तसेच ते म्हणाले, सेमीकंडक्टर्स व सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची आपल्याला निश्चित आवश्यकता आहे.

हे ही वाचा >> Faridabad : Video : पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्यात घातली अन् घडली दुर्दैवी घटना; बँकेच्या मनेजरसह एकाचा बुडून मृत्यू

गाझामधील युद्धावरही केलं भाष्य

इस्रायल हमास युद्धावर बोलताना रुवेन अझर म्हणाले, भारताने या युद्धाबाबत काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कुठपर्यंत या युद्धात सहभागी व्हायचं ते त्यांचं नेतृत्व ठरवेल. पश्चिम आशियात त्यांच्या भूमिकेला महत्त्व मिळू लागलं आहे. भारत त्यांच्या भूमिकेद्वरे आमच्या भागात (पश्चिम आशिया) स्थिरता आणि समृद्धी आणू शकतो”.