Israel-Iran Conflict : इस्रायलने गेल्या काही दिवासांपूर्वी इराणविरोधात केलेल्या लष्करी कारवाईत किमान १४ वरिष्ठ इराणी अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करून ठार केल्याचे वृत्त समोर आले होते. हा इराणच्या अणु कार्यक्रमासाठी एक खूप मोठा धक्का असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आता इराणने या शास्त्रज्ञांच्या हत्येसंबंधी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

इस्रायलचे फ्रान्समधील राजदूत जोशुआ झार्का यांनी इराणच्या अणुशस्त्रज्ञांना ठार करण्याबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. इराणच्या अणु क्षमता नष्ट करण्यासाठी त्याच्या विकासासाठी काम करत असलेल्या प्रमुख व्यक्तींना संपवणे हा मोहिमेचा उद्देश होता, असे झार्का म्हणाले आहेत. असोशिएटेड प्रेस (AP)ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

एपीशी बोलताना झार्का यांनी सांगितले की, शास्त्रज्ञांना फक्त त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाकरिता नाही, तर त्यांच्या अण्वस्त्र विकासामधील सक्रिय भूमिकेसाठी लक्ष्य करण्यात आले. ते म्हणाले की, “फक्त त्यांना भौतिकशास्त्र माहिती होतं म्हणून नव्हे, तर ते अण्वस्त्रांची निर्मिती आणि ते तयार करण्याची एकूण प्रक्रिया आणि त्याचे उत्पादन करण्याच्या संघर्षात वैयक्तिकरित्या सहभागी होते, म्हणून त्यांना ठार करण्यात आले.”

“खरंतर हा संपूर्ण समूह गायब होणे हे (अणु) कार्यक्रमाला मुळात काही वर्षांनी मागे टाकत आहे, काहीएक वर्षे मागे टाकत आहे” असे झार्का म्हणाले. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, “मला वाटते की इराणमध्ये भविष्यातील अण्वस्त्र कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी ज्या लोकांना विचारणा केली जाईल ते त्याबद्दल दोनदा विचार करतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने एपीने दिल्ल्या वृत्तानुसार, १४ पैकी ९ शास्त्रज्ञइस्रायलने १३ जून रोजी केलेल्या सुरुवातीच्या हल्ल्यात ठार झाले. ज्यांना ठार करण्यात आले त्यांच्यामध्ये फिजिसीस्ट, केमिस्ट, मटेरियल सायंटिस्ट, एक्सप्लोझिव्ह एक्सपोर्ट आणि अभियंते यांचा समावेश होते. इस्रायलच्या मते त्यांना अण्वस्त्र विकासाचा काही दशकांचा अनुभव होता.