Iran’s Ali Larijani Targeted And Killed in Israel Strike: इस्रायलने इराणला आणखी एक मोठा झटका दिला आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे. या हल्ल्यात लारीजानी ठार झाले आहेत, असे वृत्त बीबीसीने प्रसिद्ध केले आहे. लारीजानी इराणच्या प्रशासनातील एक प्रमुख व्यक्ती मानले जात होते.

 इराणचे सुरक्षा प्रमुखांना लक्ष्य

इस्रायली लष्कराने रिव्होल्युशनरी गार्डच्या स्वयंसेवक असलेल्या बसिज दलाचे प्रमुख गुलाम रझा सोलेमानी यांना ठार केल्याचेही सांगितले. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्यानंतर, या हत्यांमुळे इराणी प्रशासनातील आणखी एका सर्वोच्च नेता मरण पावला आहे. दरम्यान, इराणच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. इस्रायलने रात्रीच्या सुमारास हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

इस्रायचा कारवाईच्या वृत्ताला दुजोरा

इस्रायली हवाई हल्ल्यात पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे नेते अक्रम अल-अजौरी यांच्यासह गटाच्या इतर वरिष्ठ सदस्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे संरक्षण सूत्रांचा हवाला देत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. इस्रायल संरक्षण दलाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल आयल झमीर यांनी या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. झमीर यांनी मंगळवारी सकाळी दिलेल्या माहितीत इराणवरील हल्ल्याची माहिती दिली.

अयातुल्लांच्या जवळचे व्यक्ती

लारीजानी अयातुल्ला खामेनी यांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. लारीजानी यांचा मृत्यू इराणसाठी मोठा धक्का ठरणार आहे. अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर लारीजानी यांचा मृत्यू इराणसाठी मोठा झटका देणारा असेल. लारीजानी तेहरानमध्ये विविध कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या माहिती देणाऱ्यांना अमेरिकेने १० मिलियन डॉलर एवढे बक्षीस जाहीर केले होते. यात लारीजानी यांचाही समावेश होता.

मुस्लिम राष्ट्रांविरोधात नाराजी

लारीजानी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुस्लिम राष्ट्रांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. इराणचे युद्ध इस्रायल आणि अमेरिकेविरोधात आहे. इराणला समर्थन न देणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांवर लारीजानी यांनी नाराजी व्यक्त केली होती.