इस्रायलमध्ये परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी

इस्रायलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणू मंत्रिगटाने विविध उपाययोजनांना मंजुरी दिली आहे.

तेल अविवनजीकच्या बेन गुरिऑन विमानतळावरील प्रवासी.

जेरूसलेम

करोना (कोविड १९) चा ओमिक्रॉन हा नवा उत्परिवर्तित विषाणू देशात पसरू नये यासाठी परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी करण्याचा, तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याबाबतचे वादग्रस्त तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय रविवारी इस्रायल सरकारने घेतला.

इस्रायलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणू मंत्रिगटाने विविध उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यात ५० आफ्रिकन देशांत जाण्यावर निर्बंध, परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी आणि परदेशातून येणाऱ्या इस्रायली नागरिकांना सक्तीचे विलगीकरण आदींचा समावेश आहे.

याशिवाय इस्रायलमध्ये आढळून आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शिन बेट इंटरनल सिक्युरिटी एजन्सीने विकसित केलेले वादग्रस्त फोन नियामक तंत्रज्ञान वापरण्यासही सरकारने मुभा दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Israel to impose travel ban for foreigners over new covid variant zws