Attack on Gaza aid centre : दक्षिण गाझामधील रफाह येथे अमेरिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मदत वितरण केंद्राजवळ इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात किमान ३० पॅलेस्टिनी ठार झाले आणि ११५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हजारो पॅलेस्टिनी मदत केंद्राजवळ सर्व जमले होते, तेव्हा ही घटना घडली. एका स्थानिक पॅलेस्टिनी पत्रकाराने बीबीसी न्यूजला सांगितले की इस्रायली टँकने गर्दीवर गोळीबार केला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मृतांचे आणि जखमींचे मृतदेह घटनास्थळावरून वाहून नेण्यात आले आहेत. आज सकाळी गाझामधील रफाहजवळ झालेल्या हल्ल्यानंतर जखमी पॅलेस्टिनींना नासेर रुग्णालयात दाखल केले जात आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, हमासने रफाहमध्ये कार्यरत असलेल्या इस्रायली सैन्यावर “तथाकथित ‘मानवतावादी मदत’ वितरण स्थळांवर जमलेल्या भुकेल्या नागरिकांविरुद्ध एक नवीन हत्याकांड” घडवत असल्याचा आरोप केला आणि त्यांना “मानवतावादी मदत स्थळे नव्हे तर सामूहिक मृत्यूचे सापळे” असे संबोधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बातमी अपडेट होत आहे