भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो ( ISRO ) ही जगात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीची संस्था म्हणून ओळखली जातो.अजूनही जगात हातावर मोजता येतील इतक्या मोजक्या देशांनाच स्वबळावर कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवणे शक्य झाले आहे. इस्रो ही सरकार नियंत्रित संस्था आहे. मंगळयान,चांद्रयान अशा मोहिमांमुळे जगात इस्त्रोचे नाव आदराने घेतले जात असून अत्याधुनिक उपग्रह बनवणारी संस्था म्हणूनही इस्त्रोचा लौकिक आहे. एवढंच नाही तर जगात सर्वात स्वस्तात उपग्रह पाठवणारी संस्था म्हणूनही इस्रोची आणखी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

एकेकाळी स्वःताचे उपग्रह दुसऱ्या देशांच्या सहाय्याने बनवत अवकाश पाठवण्यासाठी त्यांचेच सहाय्य घेणारी इस्रो आज फक्त स्वतःचेच नाही तर इतर देशांचे उपग्रह अवकाशात पाठवत आहे. गेल्या काही वर्षात इतर देश त्यांचे उपग्रह, जगभरातील विद्यापीठ तसंच संशोधन संस्था उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी भारताच्या या इस्रोकडे रांग लावून येत आहेत. म्हणूनच असे उपग्रह प्रक्षेपित करत, अवकाशात अचूकरित्या पाठवत इस्रोने आता बक्कळ कमाई करायला सुरुवात केली आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
11 billion dollar semiconductor project in pune say union minister rajeev chandrasekhar
पुण्यात ११ अब्ज डॉलरचा ‘सेमीकंडक्टर’ प्रकल्प! केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र

हेही वाचा… Gene Editing: सैनिकांच्या DNA मध्ये बदल करण्याची चीनची नवी खेळी; काय आहे ‘जीन एडिटिंग’ जाणून घ्या

जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०२२ या पाच वर्षात १९ देशांचे आणि त्यांमधील विविध संस्थांचे तब्बल १७७ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामधून ९४ दशलक्ष डॉलर आणि ४६ दशलक्ष युरो एवढे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच एकुण तब्बल एक हजार १०० कोटी रुपये कमावले आहेत. ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, कोलंबिया, फिनलॅड, फ्रान्स, इस्राइल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका या देशांचे किंवा या देशातील विविध संस्थांचे उपग्रह गेल्या पाच वर्षात इस्रोने अवकाशात प्रक्षेपित केले आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : “महावितरण अदानी कंपनीला चालवण्यास देऊ नका”, नाशिकमध्ये वीज कर्मचाऱ्यांची मागणी, वाचा महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट…

दोन वर्षांपूर्वी भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील धोरणात बदल केला. देशातील खाजगी संस्थांना उपग्रह बनवणे, प्रक्षेपित करण्याठी प्रक्षेपक – रॉकेट तयार करणे तसंच या क्षेत्राशी संबंधित विविध उपकरणे बनवणे यासाठी नियमात बदल केले. यामुळेच गेल्या महिन्यात एका खाजगी संस्थेने स्वबळावर रॉकेट तयार करत उपग्रह प्रक्षेपित केला आहे. तसंच इस्रोने कमी वजनाचे उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी नवा प्रक्षेपक तयार केला आहे.